आज (24 ऑगस्ट) म्हणजेच शनिवारी सकाळी भारतीय संघाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता गब्बर कधीही भारताकडून खेळताना दिसणार नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला. मात्र, पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार की नाही याबाबत त्याने कोणतीही माहिती दिली नाही. शिखर धवन बराच काळ टीम इंडियापासून दूर होता. असे असूनही त्याची कमाई अप्रतिम राहिली. धवनची एकूण संपत्तीही प्रभावी ठरली आहे. तो करोडो रुपयांचा मालक आहे. चला तर या बातमीद्वारे त्याच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूयात.
38 वर्षीय शिखर धवनची 2024 मध्ये एकूण संपत्ती सुमारे $17 दशलक्ष (अंदाजे 120 कोटी रुपये) असल्याचे मानले जाते. क्रिकेट खेळण्यासोबतच तो ब्रँड जाहीरातीमधूनही चांगली कमाई करतो. गब्बर अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे. याशिवाय धवनकडे महागडी लक्झरी कार आणि बाईकही आहेत. त्याला आयपीएलमधूनही चांगले उत्पन्न मिळते. धवनकडे काही आलिशान मालमत्ताही आहेत.
जोपर्यंत शिखर धवन भारतीय संघाशी संबंधित होता. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडूनही पगार मिळत असे. मात्र, वार्षिक करारातून बाहेर पडल्यानंतर तेथून पैसे येणे बंद झाले. पण शिखरने आयपीएलच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. गब्बर 2008 पासून आयपीएल खेळत आहे. 2024 पर्यंत धवनने आयपीएलमध्ये एकूण 91.8 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच शिखर धवनकडे दिल्ली आणि मुंबईत आलिशान घरे आहेत. 2020 मध्ये या मालमत्तांची किंमत 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
शिखर धवनलाही महागड्या गाड्यांचा छंद आहे. त्याच्याकडे ऑडी ए 6, बीएमडब्लूय 6 जीटी, रेंज रोव्हर स्पोर्ट्स आणि बीएमडब्लूय एम 8 कूप आहे. त्याच्याकडे जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या एकूण गाड्या आहेत. याशिवाय गब्बरकडे सुझुकीची हायाबुसाही आहे. शिखर धवन अनेक कंपन्यांचा चेहरा बनला आहे. तो बोट, ओप्पो, एअरटेल इंडिया, जियो, कुरकुरे अश्या अनेक कंपन्यांशी संबंधित आहे.
हेही वाचा-
10 वर्ष मोठ्या महिलेशी लग्न केलं, छळाचं कारण देत घटस्फोट घेतला! खूपच वेदनादायी आहे शिखर धवनची लव्ह स्टोरी
विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा ‘कोहिनूर हिरा’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक
जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत