मुंबई | भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारा भारताचा माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. 2000 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत झालेल्या सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण बरोबरची भागीदारी कधीच न विसरणारी आहे. त्याच्या या खेळीबद्दल आजही प्रत्येक भारतीयांना गर्व आहे.
वास्तविक पाहता सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या आक्रमक खेळीपुढे ‘द वॉल’ राहुल द्रविड पूर्णपणे झोकाळला गेला आहे. अत्यंत शांत डोक्याने फलंदाजी करणार्या राहुलने आपल्या कारकिर्दीमध्ये विरोधी संघातील गोलंदाजाला आपली विकेट सहज कधी बहाल केली नाही. वेगवान गोलंदाज जितक्या वेगाने गोलंदाजी करायचा तो चेंडू राहुल सहज लिलया खेळून काढायचा.
क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा राहुल हा अनेक गोष्टींवर अंधविश्वास ठेवून चालायचा. मैदानात त्यांच्याकडून जास्तीजास्त चांगली कामगिरी व्हावी यासाठी विविध तोटके वापरायचा.
राहुल द्रविड हा मेहनती खेळाडू आहे. नेट्सवर फलंदाजीचा तो तासंतास सराव करायचा. आपल्याला सतत यश मिळावे यासाठी विविध टोटके देखील वापरायचा. हे टोटके देखील वाचून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल.
राहुल द्रविड प्रत्येक कसोटी सामन्यात नवीन कपडे घालून मैदानात उतरायचा. मैदानात उतरताना तो नेहमी पहिल्यांदा आपला उजवा पाय ठेवायचा. फलंदाजीसाठी तयार होताना नेहमी आपल्या उजव्या पायाचा थायपॅड बांधायचा. यासोबत कोणत्याही मालिकेच्या सुरुवातीला नवीन बॅट वापरत नसे.
सामन्यापूर्वी अनेक खेळाडू तासंतास नेट्सवर प्रॅक्टिस करताना दिसून येतात. पण राहुल द्रविड मैदानातल्या नेट प्रॅक्टिस नंतरही हॉटेलच्या खोल्या अथवा बेडरूममध्ये तो फलंदाजीचा सराव करायचा. एका मुलाखतीमध्ये राहुल म्हणाला होता की, रात्री झोप येत नव्हती तेव्हा तो हॉटेलच्या खोलीतच आरशाच्या समोर शाॅडो प्रॅक्टिस करायचा. फलंदाजी करताना हॉटेलमधल्या फरशीचा जोरजोरात आवाज यायचा आणि त्याचे सहकारी खेळाडू राहुलवर अनेकदा चिडायचे.
राहुलचे लग्न झाले होते तेव्हा रात्री अपरात्री फलंदाजीचा सराव करायचा. तेव्हा पत्नी विजेतालाही राहुल द्रविडला रात्री झोपेत फलंदाजी करण्याचा आजार असल्याचे वाटले.
भारताला अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावून देणाऱ्या राहुलने भारतीय संघाकडून 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात कसोटी सामन्यात 36 शतके लगावली आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 शतके ठोकली आहेत. द्रविडने 52.32 च्या सरासरीने 13 हजार 288 कसोटी धावा तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 39.16 च्या सरासरीने 10 हजार 889 धावा केल्या आहेत.