मुंबई । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी मागील काही दिवसांपासून त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. मागील महिन्यात त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर भारतात आफ्रिदीवर टीकेची झोड उडाली होती.
नुकताच आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जम्मू काश्मीर अनंतनाग येथे राहणारा क्रिकेटर मीर मुर्तझा हा वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात आला. त्यानंतर तो कराची येथे पोहोचला. आफ्रिदीच्या घरी तो तीन महिने राहिला होता, असे असे तो व्हिडिओमध्ये सांगत आहे.
https://www.instagram.com/tv/CAxEX9Ip5a9/?utm_source=ig_embed
यावेळी आफ्रिदीने मुर्तजाला क्रिकेटचे धडे दिले. आफ्रिदीच्या मते, मीर मुर्तजा हा खूप प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. जगातील प्रत्येक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी उपलब्ध आहे. मी त्याचे स्वागत करतो. तो खूप काही शिकू इच्छितो. त्याला कोचिंगच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मदत करेल.
व्हिडिओवर केला प्रश्नचिन्ह उपस्थित
आफ्रिदी पुढे बोलताना म्हणाला, काश्मीरवरून येणारा हा पहिला काश्मिरी क्रिकेटपटू आहे. तो माझा खूप मोठा फॅन आहे. लाहोर कलंदरचे डायरेक्टर अतिफ राणा यांनीही मीरचे स्वागत केले. आफ्रिदीच्या या व्हिडिओवर अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत. भारतातून पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मीर मुर्तझाला व्हिजा कसा मिळाला? तो पाकिस्तानात जाऊच कसा शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.