---Advertisement---

अरे बाबा चेंडू बघून तरी थांबायचं! पाकिस्तानी खेळाडूने ‘असा’ सोडला सोपा झेल, Video पाहून व्हाल लोटपोट

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 1:06 PM
---Advertisement---

पाकिस्तानी संघाबद्दल दरवेळी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. बऱ्याच वेळेला खेळाडू असे क्षेत्ररक्षण करतात की प्रेक्षक हसू रोखू शकत नाहीत. सोमवारी (१२ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात असेच काहीसे घडले. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शारजील खानने सहज सोपा झेल पकडण्यात चुकी केली आणि मग सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला सुरुवात झाली. तो जवळपास ४ वर्षांनंतर पाकिस्तान संघाकडून खेळत होता.

झाले असे की, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात दुसरा टी२० सामना चालू होता. सामना चालू असताना १३ व्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत होता आणि पाकिस्तान संघ क्षेत्ररक्षण करत होता. पाकिस्तान संघाचा उस्मान कादीर गोलंदाजी करत होता आणि जॉर्ज लिंडे स्ट्राईकवर होता. कादीरने लिंडेकडे एक गुगली फेकली. त्याने चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला.

चेंडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता असलेल्या शारजीलच्या दिळेने गेला. परंतु तो चेंडू नक्की कुठे येऊन पडेल, याचा अंदाज घेण्यात चुकला. तो दोन्ही हात वरु करुन चेंडू झेलण्यासाठी उभा राहिला खरा. परंतु चेंडू त्याच्या मागे जाऊन पडला. त्याला थोड्या काळासाठी काय झाले ते समजलेच नाही आणि मग दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमारेषेवर जाण्यापासून वाचवला.

https://twitter.com/taimoorze/status/1381628907280011265?s=20

दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला सामना
सोमवारी झालेल्या दुसर्‍या टी२० सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तान संघाने ९ बळींच्या बदल्यात १४० धावा काढल्या. त्यांच्याकडून बाबर आझम (५०) आणि मोहम्मद हफीझ (३२) हे दोनच खेळाडू २० पेक्षा जास्त धावा करू शकले. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडे आणि लिझाड विल्यम्स यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ १४ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. त्यांच्या संघाकडून सलामीवीर आयडन मार्करामने ३० चेंडूत ५४ धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार हेनरिक क्लॅसेनने २१ चेंडूत ३६ आणि जॉर्ज लिंडेने १० चेंडूत २० धावा केल्या. अष्टपैलू खेळासाठी जॉर्ज लिंडे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मुंबई इंडियन्सची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याचचं बोला,’ मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

चिवट लढतीनंतर कडवा शेवट, केकेआरच्या लाजिरवाण्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

रोहितसारखा कर्णधार होणे नाही! त्याच्या ‘त्या’ शब्दांमुळे मला एवढी दमदार गोलंदाजी करता आली- राहुल चाहर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---