केप टाउन | दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघावर बंदी येण्याचा धोका सध्या निर्माण झाली आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या गंभीर गैरव्यवहारानंतर क्रिकेटच्या राष्ट्रीय संघटनेच्या कार्यात हस्तक्षेप करण्याची दक्षिण आफ्रिका सरकारची भूमिका आहे.
देशाचे क्रीडामंत्री नाथी मॅथेथवा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सरकारच्या भूमिकेविषयी माहिती दिली आहे. आयसीसीच्या घटनेत सरकारी हस्तक्षेप करण्यास बंदी आहे आणि शिक्षा म्हणून राष्ट्रीय क्रिकेट मंडळाने स्वतंत्रपणे काम सुरू करेपर्यंत देशाच्या संघाला सामान्यपणे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घातली जाते.”
क्रिकेट मंडळाच्या कारभारावर दीर्घकाळ सुरू असलेल्या चौकशीमुळे दक्षिण आफ्रिका सरकार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) यांच्यात तणाव आहे. ऑगस्टमध्ये सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी थाबंग मेरोई यांना गंभीर गैरवर्तनाच्या आरोपावरून पदावरून काढून टाकले गेले. परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने स्वतंत्र चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिका स्पोर्ट्स फेडरेशन आणि ऑलिम्पिक समितीने सीएसए प्रकरणाचा सरकारने स्वत: केलेल्या चौकशीचा निषेध केला.
तथापि, सीएसएने अखेर या महिन्यात फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल सादर केला. हा अहवाल मिळाल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, त्यानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
बऱ्याच काळापासून वंशवाद, भ्रष्टाचार आणि खेळाडूंच्या पगाराच्या मुद्द्यांवरून बोर्डात वाद होत होते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा व ऑलिम्पिक समितीने एक पत्र लिहून सर्व बोर्ड अधिका-यांना पद सोडायला सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ते माझे कर्तव्यच! चेन्नईसाठी वॉटर-बॉय झालेल्या ताहिरच्या भावूक ट्विटने जिंकली चाहत्यांची मने
“फलंदाजाने १०० मीटरपेक्षा अधिक लांब षटकार ठोकल्यास त्याला अतिरिक्त धावा…”
दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर
आयपीएलचे नाव खराब झालेले ५ सर्वात मोठे वाद
मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा