सेंट ल्युसिया | विडीज विरूध्द श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमल दोषी आढळला आहे.
त्याला आयसीसीच्या कलम 41.3 नुसार एका कसोटी सामन्यासाठी सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांनी निलंबित केले आहे. त्याचबरोबर चंदिमलचे या कसोटी सामन्यासाठीचे १००% मानधनही कापण्यात आले आहे.
सेंट ल्युसिया येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने बॉलशी छेडाछाड केल्याचे व्हीडीओ फुटेजच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे.
दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांच्यासमोर चंदिमलची सुनावनी झाली. यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले.
या सुनावलीसाठी दुसऱ्या कसोटी सामन्याचे मैदानावरील दोन्ही पंच, तिसरे पंच आणि श्रीलंकेचे संघ व्यवस्थापन उपस्थित होते.
दिनेश चंदिमलला एका सामन्याच्या निलंबनासहीत दोन डिमेरीट गुण देण्यात आले आहेत.
तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होताना पंचाच्या बॉल बदलण्याच्या निर्णयाला विरोध करत श्रीलंकन संघ दोन तास उशीराने मैदानात उतरला होता.
या कृत्यामुळे आयसीसीच्या कलम 2.3.1 चा भंग झाल्याने खेळाच्या प्रतिमेला नुकसान करण्याच्या आरोपाखाली श्रीलंकेचा कर्णधार चंदिमल, प्रशिक्षक चंदिका हस्तुरसिंगे आणि संघ व्यवस्थापक आसंका गुरूसिंहा याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा गुन्हा सिद्ध झाला तर कर्णधार चंदिमल, प्रशिक्षक चंदिका हस्तुरसिंगे आणि संघ व्यवस्थापक आसंका गुरूसिंहा यांना चार ते आठ डिमेरीट गुणांची शिक्षा होईल.
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!