आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या काळात संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये होत आहे. कोविड १९च्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटवर हळू हळू लीगमधून वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडत आहेत. यात परदेशी खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे. अशातच जर परदेशी खेळाडूंनी खूप मोठ्या प्रमाणावर माघार घेतली तर भारतीय क्रिकेटपटूंना याचा नक्कीच फायदा होणार आहे. यातील काही मोजक्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेईया.
१. देवदत्त पड्डीकल (Devdutt Padikkal)
कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल हा प्रथम श्रेणी क्रिकेट २०१९-२० मध्ये उत्कृष्ट खेळताना दिसला. त्याने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत शानदार खेळ दाखविला होता. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच्या बॅटने धावांचा पाऊस पडला.
२०१९-२० मध्ये विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत देवदत्त पड्डीकल हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने विजय हजारे वनडे स्पर्धेच्या ११ सामन्यात ६७.६६ च्या नेत्रदीपक सरासरीने एकूण ६०९ धावा केल्या. तसेच या स्पर्धेत २ शतक आणि ५ अर्धशतकंही केले. सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीतून सर्वाधिक धावा निघाल्या होत्या.
तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. आरसीबीकडे परदेशी खेळाडू ऍरोन फिंच (Aaron Finch) होता जो सलामीला यायचा, परंतु जर तो आयपीएल खेळला नाही तर त्याचा थेट फायदा देवदत्त पड्डीकलला होईल आणि आयपीएल २०२० मध्ये तो पार्थिव पटेल सोबत आरसीबी कडून डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
२. तुषार देशपांडे (Tushar Deshpande)
तुषार देशपांडे हा मुंबईचा वेगवान गोलंदाज आहे. गेली २-३ वर्षे तो मुंबईच्या टीमसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे या वेगवान गोलंदाजची दिल्ली कॅपिटल संघात निवड झाली आहे.
जर दिल्लीच्या संघातील विदेशी खेळाडू कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आयपीएलमध्ये सहभागी होता आले नाही तर तुषार देशपांडे याला याचा मोठा फायदा होऊ शकतो. दिल्ली संघाच्या खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळू शकतो आणि आपली छाप पाडण्याची सुवर्ण संधी त्याला मिळू शकते.
३. रवि बिश्नोई (Ravi Bishnoi)
राजस्थानचा युवा खेळाडू रवी बिश्नोई याला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण झाले होते. तथापि, विदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग न घेतल्यास अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) खेळू शकणार नाही.
मुजीब उर रहमान किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत नसेल तर त्याचा जास्त फायदा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला होईल, ज्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली होती.
४. यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal)
उत्तर प्रदेशच्या यशस्वी जैसवालने १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये १३३.३ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ४०० धावा केल्या होत्या. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट ८२.४७ असा होता. त्याने या स्पर्धेत एकूण ४ अर्धशतके आणि १ शतक केले.
विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने दुहेरी शतकही केले आहे. जॉस बटलर (Jos Buttler) हा परदेशातील खेळाडू राजस्थान रॉयल्सचा कडून सलामीला खेळतो. या परदेशी खेळाडूमुळे यशस्वी जैसवालला संधी मिळणे अवघड वाटत असले तरी परदेशी खेळाडू आयपीएल २०२० मध्ये सहभागी न झाल्यास यशस्वी जैसवालला राजस्थान रॉयल्सकडून सलामीसाठी खेळण्याची संधी मिळू शकते.
५. ईशान पोरेल (Ishan Porel)
पश्चिम बंगालचा ईशान पोरेल याने दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे बंगाल संघाने २०१९-२० या मोसमातील रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली.
या युवा गोलंदाजाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात २० लाखांच्या किंमतीला विकत घेतले. आयपीएल २०२० मध्ये परदेशी खेळाडू सहभागी न झाल्यास पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell) आणि हार्ड्स विलजॉन (Hards Viljoen) सुद्धा खेळणार नाहीत. याचा फायदा युवा वेगवान गोलंदाज ईशान पोरालला होऊ शकतो आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी असेल.