खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतेय. या प्रयत्नांना आता यश आल्याचे दिसत आहे. 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटला स्थान मिळण्याची शक्यता आता वाढली आहे.
जवळपास सर्वच राष्ट्रकुल देशांमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जातो. सध्या इतरही अनेक देश यामध्ये हात आजमावतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टी असताना अद्याप क्रिकेटला आधुनिक ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालेले नाही. मागील जवळपास वीस यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
ऑलिम्पिक आयोजित करणारा देश आपल्या आयोजनात दरवेळी काही खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करू शकतो. अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेने निवडलेल्या 9 खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश असून, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ शकतो.
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ऑलिम्पिकमध्ये सहा संघांना प्रवेश मिळू शकतो. पुरुष व महिला गटात हे सहा संघ खेळतील. पात्रतेच्या अखेरच्या दिवसापर्यंत क्रमवारीत पहिल्या सहा स्थानी असलेल्या संघांनाच ही संधी मिळेल. प्रत्येकी तीन संघांचे दोन गट यावेळी केले जातील. त्यानंतर त्यांच्यात उपांत्य फेरी व अंतिम फेरी खेळली जाईल.
लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 2028 ऑलिम्पिकआधी आयसीसीने अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठी 2024 टी20 विश्वचषकाचे सहयजमानपद अमेरिकेला दिले गेले आहे. तसेच पुढील वर्षी अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटचा पहिला हंगामही खेळला जाईल. या लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी अनेक आयपीएल फ्रॅंचाईजी उत्सुक आहेत.
(cricket will see in 2028 la olympics)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच