कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमधील टी२० लीग पाकिस्तान सुपर लीग (पीएलएस) मागील महिन्यातच थांबविण्यात आली होते. परंतु स्पर्धेबाबत पीएसएल फ्रंचायझी कराची किंग्स संघाचे मालक सलमान इकबाल यांनी मोठा खुलासा केला आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत इकबाल म्हणाले की, आमच्या संघात असणारा इंग्लंडचा क्रिकेटपटू ऍलेक्स हेल्सने (Alex Hales) रात्री २ वाजता मला मेसेज केला होता की, त्याला कोरोनाची लक्षणे आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पीएसएल थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एलेक्सही तात्काळ इंग्लंडला रवाना झाला होता.
सलमान (Salman Iqbal) पुढे म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये रात्री २ वाजता मला ऍलेक्सचा मेसेज आला होता. त्याने लिहिले होते की, बॉस मला कोविड-१९ची लक्षणे दिसत आहेत. मला वाटते की आपल्या सर्वांची चाचणी झाली पाहिजे. यानंतर लगेच डीन जोन्सचा फोन आला होता. त्यालाही मला भेटायचे होते.”
“आम्ही खूप घाबरलो होतो. कारण कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यानंतर आम्हाला एकमेकांपासून वेगळे राहिले पाहिजे. त्यानंतर संघातील सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात आली होती,” असेही ते पुढे म्हणाले.
इंग्लंडला पोहोचल्यानंतर ऍलेक्सने आपल्या तब्येतीची माहिती देत एक पत्र पाठविले होते. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, “सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा पहाता मला माझे मत मांडायचे आहे. जगभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे मी सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे पीएसएलमध्येच सोडून आलो होतो. मला अशा परिस्थितीत परिवारासोबत राहणे योग्य वाटत होते.”
“तसेच मला असेही वाटत होते की मी घरापासून खूप दूर परिवारापासून वेगळे राहिले पाहिजे. तरीही सध्या मी ठीक आहे. मला कोरोनाची लक्षणे नाहीत. इंग्लंडला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला ताप आला होता. यानंतर मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले होते,” असेही ऍलेक्स पुढे म्हणाला.
पीएसएल २० फेब्रवारी ते २२ मार्च, २०२० पर्यंत खेळण्यात येणार होते. तरीही पीएसएल थांबविण्यापर्यंत २ उपांत्य सामने आणि अंतिम सामना बाकी होता. यामधील उपांत्य सामना कराची किंग्स (Karachi Kings) आणि लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघात होणार होता. जो बंद स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार होता. परंतु असे काहीही झाले नाही.
याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते. परंतु या व्हायरसमुळे आयोजन पुढे ढकलण्यात आले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या कारणासाठी मानले युवराजचे धन्यवाद
–आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन
-भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आजारी, लाॅकडाऊनमुळे मिळाली नाही या राज्यात एंट्री