इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या 58व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. लखनऊ सुपर जायंट्स संघ आमने-सामने होते. हा सामना लखनऊने 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात लखनऊच्या विजयापेक्षा जास्त चर्चा एका मोठ्या वादाची झाली. जेव्हा नो-बॉलबाबत दिलेल्या वादग्रस्त निर्णयानंतर प्रेक्षकांच्या खराब वर्तनामुळे सामना काही वेळ थांबवावा लागला होता. यादरम्यान लखनऊचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी केलेले लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. आता यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
खरं तर, व्हायरल होत असलेल्या फोटोत अँडी फ्लॉवर (Andy Flower) पंचांना मिडल फिंगर (Andy Flower Middle Finger) म्हणजेच मधले बोट दाखवल्याचे बोलले जात आहे.
झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाच्या डावाील 19व्या षटकात जेव्हा आवेश खान याने अब्दुल समद याला फुलटॉस चेंडू टाकला आणि मैदानावरील पंचांनी हा चेंडू नो-बॉल दिला. हैदराबादने यासाठी डीआरएसची मागणी केली, पण तिसऱ्या पंचांनी याला योग्य चेंडू म्हटले.
मात्र, तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर सनदसोबत फलंदाजी करत असलेला हेन्रीच क्लासेन याने पंचांशी चर्चा केली. कारण, टीव्ही रिप्ले आणि ‘बॉल ट्रॅकर’मध्ये चेंडू फलंदाजाच्या कमरेसोबतच यष्टींच्याही वर जाताना दिसत होता.
यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांच्या संघाचे इतर सदस्य डगआऊटमधून उठून सीमारेषेजवळ आले. ते प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी इशारा करत होता. असे वाटत होते की, गर्दीतून कुणीतरी काही फेकले आहे. यानंतर लखनऊचे प्रशिक्षकांनी मैदानातील पंचांकडे याबाबत तक्रार केली. यावेळी फ्लॉवर यांनी पंचांना मधले बोट (Andy Flower Shows Middle Finger To Umpire) दाखवत चुकीचा इशारा केला.
Lsg coach Andy flower literally showing middle finger to the umpire 😭😭 @LucknowIPL #SRHvLSG #IPL2023 pic.twitter.com/avzLv0oPsL
— Piyush Khastagir🇮🇳 (@Piuuuushhh2004) May 13, 2023
जेव्हा हा वाद झाला, तेव्हा प्रेक्षकही स्टेडिअममधून ‘कोहली-कोहली’ बोलत होते. कदाचित ते गंभीरला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर, काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात मोठा वाद झाला होता.
या नो-बॉलमुळे जवळपास 5 मिनिटे सामना थांबला, ज्यामुळे क्लासेनचे लक्ष विचलित झाले आणि सामना पुन्हा सुरू होताच तो बाद झाला. या डावानंतर त्याने प्रेक्षकांच्या वाईट वर्तनासोबतच पंचांच्या निर्णयावरही निराशा व्यक्त केली. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगतो, प्रेक्षकांनी नाराज केला. तुम्हाला असे अपेक्षित नाही. यामुळे माझी लय बिघडली. पंचांनीही चांगले काम केले नव्हते.”
या सामन्यात क्लासेन याने 29 चेंडूत 47 धावांची वादळी फलंदाजी केली. या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता. (cricketer andy flower shows middle finger to umpire in live match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार स्टेज 4च्या कॅन्सरने ग्रस्त; प्रार्थना करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांची चाहत्यांकडे मागणी
दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफ शर्यतीतून बाहेर! जाणून घ्या इतर संघांसाठी कसे आहे समिकरण