सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएल 2023मधील 47व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभव केला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादला 5 धावांनी पराभूत केले. या सामन्यातसह हैदराबादने हंगामातील सहावा पराभव पदरात पाडून घेतला. या पराभवानंतर हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा याने खळबळजनक वक्तव्य केले. लारा म्हणाला की, कोलकाताने त्यांना पराभूत केलं नाही, तर ते स्वत: पराभूत झाले आहेत. आता या वक्तव्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादपुढे 172 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना हैदराबादला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 166 धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताकडून हैदराबादला 5 धावांनी पराभूत व्हावे लागले. आता हैदराबाद संघ दहा संघामध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तसेच, कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे. लाराने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, “पॉवरप्लेमध्ये विकेट्स गामवले, ज्यामधून उभरताच आले नाही. आम्ही हेन्रीच क्लासेन याला डाव सांभाळण्यासाठी सांगितले. तो सहाव्या क्रमांकावर उतरतो आणि त्याच्याआधी पहिल्या पाच चांगले खेळाडू आहेत. त्याच्यासाठी हे कठीण होते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “फलंदाजांना फायदेशीर असलेल्या खेळपट्टीवर असा सामना जिंकण्याची पद्धत शोधता आली पाहिजे. मात्र, आम्ही जिंकू शकलो नाही. आम्हाला भागीदाऱ्यांवर लक्ष द्यावे लागेल. आक्रमक होणे चांगली गोष्ट आहे, पण सामना जिंकण्यासाठी टिकून खेळणेही गरजेचे आहे.”
लाराने केकेआरचे फिरकीपटू सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचीही प्रशंसा केली. तो म्हणाला की, “ते शानदार फिरकीपटू आहेत. आम्ही पाहिले आहे की, स्पर्धेत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असते. नारायण आणि चक्रवर्ती यांसारखे फिरकीपटू हे जागतिक स्तरावरील आहेत. आम्ही सामन्यात कायम होतो, पण आम्ही स्वत:च सामना गमावला.”
केकेआरचा सामनावीर पुरस्कार पटकावणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सामन्यानंतर म्हणाला की, “सीमारेषेच्या दिशेने लांब शॉट मारण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांना उकसवण्याचीत्याची रणनीती यशस्वी ठरली.” तो म्हणाला की, “खूप दबाव होता, पण नितीश मला एकच गोष्ट सांगत होता की, सीमारेषेच्या दिशेने खेळण्यासाठी त्यांना प्रवृत्त कर. आम्ही तेच केले आणि हा महत्त्वपूर्ण विजय मिळाला.”
Varun Chakaravarthy is adjudged Player of the Match for his bowling figures of 1/20 as #KKR snatch a thrilling victory.
Scorecard – https://t.co/dTunuF3Ie4 #TATAIPL #SRHvKKR #IPL2023 pic.twitter.com/UwnB2U6IG7
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
हैदराबाद संघाने हंगामात 9 सामने खेळले असून त्यातील फक्त 3 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात पुढील सामन्यांमध्ये हैदराबाद संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer brian lara slams batsman for poor performance against kkr match in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विस्फोटक रसेलचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच खेळाडू
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच