भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. या दुखापतीमुळे तो अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना देखील मुकला असून तो कधी पुनरागमन करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज राहिलेल्या आरपी सिंग त्याने बुमराहचा सक्षम पर्याय म्हणून मोहम्मद सिराज याचे नाव सुचवले.
भारतीय संघाच्या गोलंदाज आक्रमणाचा प्रमुख म्हणून जसप्रीत बुमराह याच्याकडे पाहिले जाते. मागील वर्षी तो आशिया चषकापासून कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेत खेळला नाही. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील दोन सामने खेळून तो जायबंदी झाला होता. त्यानंतर त्याने अद्याप मैदानात पाऊल टाकले नाही. मागील महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून विश्रांती घेतोय.
बुमराहच्या भारतीय संघातील जागेविषयी बोलताना आरपी म्हणाला,
“निश्चितपणे तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. मात्र, तो नसताना त्याच्या जागी मोहम्मद सिराजने त्याचा पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध केले. मागील वर्षभरातील त्याची कामगिरी नजरेत भरणारी आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून माझे त्याच्यावर लक्ष असून, त्याने स्वतःमध्ये लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे. त्याचा फिटनेस चांगला असून, तो भारताचा भविष्यातील मोहम्मद शमी बनेल.”
सिराज मागील काही काळापासून जागतिक वनडे क्रमवारी पहिल्या तीनमध्ये टिकून आहे. आयपीएलच्या चालू हंगामात देखील आरसीबीसाठी त्याची कामगिरी जबरदस्त राहिलीये. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 15 बळी मिळवले असून, पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतो.
(RP Singh Said Mohammad Siraj Is Perfect Replacement Of Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विस्फोटक रसेलचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच खेळाडू
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच