नवी दिल्ली। वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या चाहत्यांसाठी आनंंदाची बातमी आहे. खरंतर, लाराबद्दल माध्यमांमध्ये असे वृत्त येत होते की तो कोरोना व्हायरस बाधित झाला आहे. परंतु लाराने हे सर्व वृत्त फेटाळले. त्याने म्हटले की या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. इतकेच नाही, त्याने लोकांना अपील करत म्हटले की, ते या व्हायरसबद्दल नकारात्मकता पसरवू नये.
विशेष म्हणजे सोशल मीडियावर काही लोकांनी म्हटले होते की, लारा कोरोना बाधित आढळला आहे. लाराने परिस्थिती स्पष्ट करत म्हटले की, त्याचे कोविड-१९ची चाचणी झाली. परंतु निकाल निगेटिव्ह आला आहे. लाराने इंस्टाग्रामवर लिहिले की, “मी त्या अफवांबद्दल वाचले, जे माझ्या कोविड-१९ पॉझिटिव्हबाबत होत्या तसेच खरे काय आहे हे मी सांगणे गरजेचे आहे. ही माहिती चूकीची नाही, तर कोविड-१९ च्या या कठीण काळात अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरविणे धोकादायक आहे.”
https://www.instagram.com/p/CDhGVqalnTn/
तो पुढे म्हणाला, “अशा अफवांचा मला वैयक्तिकरित्या परिणाम झाला नाही. परंतु चिंता अशी आहे की अशी माहिती पसरवणे चुकीचे आहे आणि यामुळे माझ्या लोकांमध्ये अनावश्यक चिंता निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत अशी नकारात्मकता पसरवू नका. मला आशा आहे की आपण सर्वजण सुरक्षित आहोत. कारण सद्य परिस्थिती पाहिल्यास एखाद्याला अंदाज येऊ शकतो की कोविड-१९ नजीकच्या काळात कुठेही जाणार नाही.”
विशेष म्हणजे या व्हायरसमुळे जगभरात ७ लाख लोकांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर ही संख्या वाढतच आहे. तरीही या व्हायरसच्या औषध आणि लसीवर काम सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
-५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
-क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
-या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत