आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट तीन प्रकारात खेळले जाते. ते म्हणजे कसोटी, वनडे (एकदिवसीय) आणि टी20 होय. असे असले, तरीही क्रिकेटचं प्रस्थ जगभरात वाढत आहे. अनेक देशांनी आपापल्या क्रिकेट लीग सुरू केल्या आहेत. या स्पर्धांचा प्रकार आणखी छोटा म्हणजे टी10 करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू भाग घेत आहे. अशातच 18 ते 27 ऑगस्ट दरम्यान पार पडत असलेल्या यूएस मास्टर्स टी10 लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी (दि. 22 ऑगस्ट) 3 सामने खेळले गेले.
यूएस मास्टर्स टी10 लीग 2023 (US Masters T10 League 2023) स्पर्धेत मंगळवारी पहिल्या सामन्यात मोरिसविले युनिटी संघाने कॅलिफोर्निया नाईट्स संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. तसेच, दुसऱ्या सामन्यात टेक्सास चार्जर्स संघाने न्यू जर्सी लिजेंड्स संघाविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. याव्यतिरिक्त तिसऱ्या सामन्यात न्यूयॉर्क वॉरियर्स संघानेही अटलांटा रायडर्स संघावर 6 विकेट्सने रोमांचक विजय साकारला. या सामन्यांदरम्यान गौतम गंभीर, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे खेळाडू फ्लॉप ठरले. रॉबिन उथप्पा आपल्या संघासाठी शानदार खेळी साकारण्यात यशस्वी झाला.
मोरिसविले संघाचा विजय
पहिल्या सामन्यात कॅलिफोर्निया नाईट्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकात 4 विकेट्स गमावत 100 धावा केल्या. यामध्ये ऍरॉन फिंचने 30 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. कर्णधार सुरेश रैना (Suresh Raina) याला खातेही खोलता आले नाही. कॅलिफोर्निया संघाचे आव्हान हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्या नेतृत्वातील मोरिसविले युनिटीने 8.5 षटकात 3 विकेट्स गमावत पार केले. यावेळी पार्थिव पटेलने 9 चेंडूत 14 धावांची खेळी साकारली. तसेच, कोरी अँडरसनने 5 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.
☝️frame ✌️legends 🔥@ImRaina 🫶 @harbhajan_singh#MVUvCK #SunshineStarsSixes#CricketsFastestFormat #T10League pic.twitter.com/y6qUSyd1nb
— US Masters T10 (@USMastersT10) August 22, 2023
गंभीर आणि युसूफ फ्लॉप
दुसऱ्या सामन्यात न्यू जर्सी लिजेंड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत फक्त 57 धावाच करू शकला. कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यावेळी फक्त एक धाव करू शकला, तर युसूफ पठाणला खातेही खोलता आले नाही. फिडेल एडवर्ड्स आणि एहसान आदिल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. टेक्सास चार्जर्सने हे आव्हान 4 षटकातच 2 विकेट्स गमावत पार केले. मोहम्मद हाफिजने 8 चेंडूत 27 धावांची खेळी साकारली.
न्यूयॉर्क वॉरियर्सचा विजय
तिसऱ्या सामन्यात अटलांटा रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 103 धावा चोपल्या. यावेळी रॉबिन उथप्पा 25 चेंडूत 32 धावा आणि लेंडल सिमन्स याने 23 चेंडूत 41 धावांची खेळी साकारली. सोहेल खान याने 15 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या. न्यूयॉर्क वॉरियर्स संघाने हे आव्हान 10 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले. जोनाथन कार्टर याने 19 चेंडूत नाबाद 41 धावांची झंझावाती खेळी केली. तसेच, मिस्बाह उल हक यानेही 8 चेंडूत 15 धावांची नाबाद खेळी केली. (cricketer gautam gambhir and suresh raina flopped parthiv patel team win the match in us masters t10 league 2023)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! दिग्गज अष्टपैलू जिवंत, निधनाची बातमी निघाली फेक; माजी खेळाडूची पुष्टी
The Hundred लीगमध्ये घोंगावलं हॅरी ब्रूक नावाचं वादळ, ठोकलं स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक