विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या स्पर्धेनंतर भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
आधी टी20 मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा खांदा सर्वात पुढे होता, पण तो विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अशात आता त्याच्याविषयी बातमी समोर येत आहे की, तो नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही बाहेर पडू शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत (Hardik Pandya set to miss the T20 series against Australia and South Africa) खेळू शकणार नाही. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर पडला होता. पंड्या त्यानंतर एकही सामना खेळला नाही. त्यानंतर त्याला उपचारासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे पाठवले गेले. 2 आठवड्यांपूर्वी पंड्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. पहिल्या 3 चेंडू टाकल्यानंतर त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. मात्र, चौथ्या चेंडूवर त्याच्या घोट्याला वेदना झालेल्या.
Hardik Pandya set to miss the series against Australia & South Africa. [The Indian Express]
– Bad news for India…..!!!! pic.twitter.com/0bBzXiv4gh
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर बीसीसीआयने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघात संधी दिली होती. मात्र, त्यालाही आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघ आता अंतिम सामन्यात (Team India In CWC 23 Final) पोहोचला आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) विजयी संयोजनासह अंतिम सामना खेळू इच्छित असेल. खरं तर, फक्त 5 गोलंदाजांच्या जोरावर रोहित आणि कंपनीने स्पर्धेचा अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास केला आहे. सध्या अशी चर्चा आहे की, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुल याच्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संभावित भारतीय संघ-
यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, दीपक चाहर (Cricketer hardik pandya set to miss t20 series against australia and south africa ankle injury world cup 2023)
हेही वाचा-
Semi Final 2: ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘काही तास भीती वाटली…’
World Cup 2023 सोबतच ‘या’ स्टार खेळाडूचं करिअरही संपलं, आता कधीच खेळणार नाही वनडे क्रिकेट