क्रिकेटमध्ये स्पर्धेच्या शेवटी अनेक पुरस्कार दिले जातात. विजयी आणि उपविजयी संघाला सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाते. तसेच सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्याला सामनावीर आणि संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्याला मालिकाविराचा पुरस्कार दिला जातो. याबरोबरच खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस पाडला जातो. अशातच मध्य प्रदेशमध्ये झालेल्या एका स्पर्धेत सामनावीराला दिलेला पुरस्कार पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
सध्या भारतात पेट्रोलच्या किमतींनी सर्वांना हैरान करून सोडले आहे. अशातच अनेक लोक शासनावर टीका करताना दिसून येत आहेत. अशात मध्य प्रदेशमध्ये झालेल्या एका क्रिकेट स्पर्धेत काँग्रेसच्या एका नेत्याने केंद्र शासनावर पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून चक्क ५ लिटर पेट्रोलचा कॅन पुरस्कार म्हणून दिला सामनावीर ठरलेल्या खेळाडूला आहे. यावेळचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही स्पर्धा भोपाळमध्ये खेळवण्यात आली असून. या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शुक्ला यांनी केले होते. २८ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सनराइजर्स ११ आणि शागीर तारीक ११ हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सनराइजर्स ११ संघाने सामना जिंकला. यांनतर सलाउद्दीन अब्बासी याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याच्या कामगिरीबद्दल त्याला सध्याचा घडीचा सर्वात महागडा पुरस्कार म्हणजेच ५ लिटर पेट्रोलचा कॅन देण्यात आला.
https://twitter.com/Rofl_Raju_/status/1366315732523380738?s=20
I was legit joking in the earlier tweet. Now someone really gifted 5L petrol as a man of the match prize 😂😂
What has this nation come to man 😂😂 https://t.co/EpXwbKzggs pic.twitter.com/vzZAhf9i2U
— Gaurav Nandan Tripathi 🜃 (@Cric_Beyond_Ent) March 1, 2021
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही लोक म्हणत आहेत की, “असेच हास्य येते चेहऱ्यावर जेव्हा तुम्हाला सामनावीर म्हणून ५ लिटर पेट्रोलचा कॅन देण्यात येतो.” तर काही म्हणत आहेत,” मी तर मस्करी म्हणून ट्विट केले होते की, सामनावीर म्हणून पेट्रोल द्या. पण आता तर खरंच कोणाला तरी सामनावीर म्हणून ५ लिटर पेट्रोल पुरस्कार म्हणून देण्यात आला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
एक हात फ्रॅक्चर असतानाही दिली काट्याची टक्कर, वॉर्नरच्या मुलीचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलमध्ये खेळापेक्षा पैशांची जास्त चर्चा होते म्हणणाऱ्या स्टेनला मागावी लागली माफी, म्हणाला…
बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना; ‘इतके’ दिवस झालती मॅच