भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आता भारतीय संघ तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचला आहे. अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, यादरम्यान खेळाडूंनी केलेली मस्ती कॅमेऱ्यातही कैद झाली. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात तिसरा आणि अखेरचा टी20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबाद येथे पोहोचताच त्यांचे हॉटेलमध्ये पारंपरिक अंदाजात स्वागत झाले. यादरम्यान ईशान किशन (Ishan Kishan) स्वागतावेळी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला त्रास देताना दिसला. स्वागतावेळी ईशान सतत पृथ्वीची टोपी ओढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. पृथ्वी शॉन याने ईशानला असे करण्यापासून रोखले.
बीसीसीआयने भारतीय संघाचा अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतरचा आणि स्वागताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने लिहिले की, “हॅलो अहमदाबाद. आम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यासाठी येथे पोहोचलो आहोत.”
Hello Ahmedabad 👋
We are here for the third & final T20I of the #INDvNZ series 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/gQ1jPEnPvK
— BCCI (@BCCI) January 30, 2023
या व्हिडिओत ईशान आणि पृथ्वीमध्ये घडलेली घटनाही दिसत आहे. चाहतेही ईशान आणि पृथ्वीच्या या अंदाजाला पसंती दर्शवताना दिसत आहेत.
दुसऱ्या टी20 सामन्याविषयी
भारतीय संघाने दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला होता. 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पंड्या याच्या सेनेला चांगलाच संघर्ष करावा लागला. सामन्यानंतर पंड्याने खेळपट्टीवर जोरदार टीकाही केली. त्याने खेळपट्टीला धक्कादायक म्हटले. तसेच, टी20 क्रिकेटसाठी उपयुक्त नसल्याचेही म्हटले. न्यूझीलंड संघाने या सामन्यात 99 धावा चोपत 100 धावांचे आव्हान ठेवले होते.
सुरुवातीला 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे वाटत होते. मात्र, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांसाठी हे आव्हान कठीण करून ठेवले होते. मात्र, कर्णधार पंड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शेवटी विजय मिळवून दिला. तसेच, मालिकेत बरोबरी साधली. विशेष म्हणजे, दोन्ही संघाच्या फलंदाजांना या लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर एकही षटकार मारता आला नव्हता. (cricketer ishan kishan teases prithvi shaw as team india arrives in ahmedabad for 3rd t20i see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं