वेस्ट इंडिज संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यातील कसोटी आणि वनडे मालिका पार पडली आहे. तसेच, टी20 मालिकेतील दुसरा सामना सेंच्युरियन येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज जॉनसन चार्ल्स याने विक्रम रचला आहे. त्याने सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत ख्रिस गेल याला पछाडले आहे.
झाले असे की, या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी वेस्ट इंडिज संघाकडून डावाची सुरुवात ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्स यांनी केली. ब्रेंडन 1 धावेवरच तंबूत परतला. त्यानंतर जॉनसन चार्ल्स (Johnson Charles) याने मेयर्ससोबत 135 धावांची वादळी भागीदारी रचली. यादरम्यान जॉनसनने वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक (Fastest T20I hundred by a West Indian) ठोकण्याचा विक्रम केला. जॉनसनने 39 चेंडूंत शतक ठोकले. यामुळे ख्रिस गेल (Chris Gayle) याचा विक्रम मोडला गेला.
🚨 West Indies Record
Amazing innings by Johnson Charles. Fastest T20I hundred by a West Indian, breaking Chris Gayle’s @henrygayle record that was established in 2016🔥#MaroonMagic #Rainingsixes #CharlesPower #MenInMaroon #SAvWI pic.twitter.com/SxZewRI0eI
— Windies Cricket (@windiescricket) March 26, 2023
ख्रिस गेल याने वेस्ट इंडिजसाठी 47 चेंडूत सर्वात वेगवान शतक ठोकले होते. मात्र, तिसऱ्या टी20त चार्ल्सने त्याचा विक्रम मोडीत काढला. गेलने 2016मध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. तसेच, चार्ल्सने गेलपेक्षा 8 चेंडू कमी खेळत शतक ठोकले आणि विक्रमी खेळी रचली. जॉनसन याने त्याच्या डावात 46 चेंडूत 118 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 11 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 256.62 इतका होता. तो आता वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज बनला आहे.
टी20त सर्वात वेगवान शतक ठोकणारे फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम डेविड मिलर, रोहित शर्मा आणि सुदेश विक्रमासेकरा यांच्या नावावरही आहे. या तिघांनीही संयुक्तरीत्या 35 चेंडूत शतक ठोकले आहे. मिलरने बांगलादेशविरुद्ध वादळी शतक ठोकले होते. तसेच, रोहितने श्रीलंकेविरुद्ध हा कारनामा केला होता. मात्र, त्यानंतर 39 चेंडूंवर शतक ठोकणारे तीन गोलंदाज आहेत. त्यात रोमानियाच्या पेरीयालवार, हंगरीच्या जीशान आणि वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्सच्या नावाचा समावेश आहे. (cricketer johnson charles hits 39 ball hundred breaks chris gayle record fastest t20i century for west indian read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायलेकाचं प्रेम! सचिनने आईसोबतचा खास व्हिडिओ केला शेअर, 3 तासात मिळालेत 2 लाख हिट्स
WPL Final : टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, ट्रॉफीसाठी दोन्ही संघाच्या रणरागिणी देणार कडवी झुंज