इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा सातवा सामना मंगळवारी (दि. 4 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्टार खेळाडू केन विलियम्सन आयपीएल 2023मधून बाहेर पडला आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती.
विलियम्सनचे हंगामातून बाहेर होणे, गुजरातसाठी धक्का मानला जात आहे. अशात विलियम्सनचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडिओत केन विलियम्सन वॉकरच्या साहाय्याने चालताना दिसू शकतो. यावरून समजते की, त्याची दुखापत किती गंभीर आहे.
आयपीएल 2023मधून विलियम्सन बाहेर
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केन विलियम्सन (Kane Williamson) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्पर्धेबाहेर झाल्यानंतर विलियम्सन आता घरी पोहोचला आहे. तिथून तो वॉकरच्या साहाय्याने चालतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Painful to see Kane Williamson in this situation!
Wishing him a speedy recovery. pic.twitter.com/cngFRlQiyg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2023
गुजरात टायटन्सला दिल्या शुभेच्छा
भारतातून न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी केन विलियम्सन याने त्या सर्वांचे आभार मानले, ज्यांनी तो बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच, त्याने गुजरात टायटन्स संघाला विजयासाठीही शुभेच्छा दिल्या. खरं तर, विलियम्सन चेन्नईविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, त्याला दुखापतीमुळे फलंदाजी करता आली नव्हती. गुजरातने त्याच्या जागी साई सुदर्शन या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरवले होते.
https://www.instagram.com/p/CqkWwslIFJ7/?utm_source=ig_embed&ig_rid=649590b0-a556-430a-a8a0-67a202d94532
आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडलेले खेळाडू
मुंबई इंडियन्स- जसप्रीत बुमराह आणि झाय रिचर्डसन
चेन्नई सुपर किंग्स- मुकेश चौधरी आणि काईल जेमिसन
रॉयल चॅलंजर्स बेंगलोर- विल जॅक्स आणि रजत पाटीदार
दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत
पंजाब किंग्स- जॉनी बेअरस्टो
राजस्थान रॉयल्स- प्रसिद्ध कृष्णा
गुजरात टायटन्स- केन विलियम्सन
विलियम्सनची आयपीएल कारकीर्द (Players ruled out of IPL 2023)
विलियम्सनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 77 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 36.22च्या सरासरीने 2101 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 18 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 89 इतकी आहे. (cricketer kane williamson painful video after ipl 2023 exit )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
रश्मिकाला नाचताना पाहून स्वत:ला रोखू शकले नाहीत गावसकर, लावले जोरदार ठुमके; पाहा व्हिडिओ