भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) कर्नाटक विरुद्ध जम्मू- काश्मीर (Karnataka vs Jammu-Kashmir) संघातील सामन्यादरम्यान कृष्णाने आपल्या अफलातून कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटक संघाकडून खेळताना त्याने अवघ्या ३५ धावा देत एकूण ६ विकेट्स आपल्या खिशात घातले. त्याच्या या गोलंदाजीमुळे कर्नाटक संघाने एलिट ग्रूपच्या सी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मू- काश्मीरला पहिल्याच डावात ९३ धावांवर तंबूत धाडले होते. दुसरीकडे दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटक संघाने एकूण ३३७ धावांपर्यंतची मजल मारली.
मार्च २०२१ मध्ये भारतीय संघासाठी वनडे पदार्पण करणाऱ्या कृष्णाने जम्मू काश्मीरच्या फलंदाजांना तंबूत पाठवत त्यांचा पहिला डाव अवघ्या २९.५ षटकात संपवला. तत्पूर्वी कर्नाटकने पहिल्या डावात फलंदाजी करताना सकाळी ८ विकेट्सवर २६८ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. करुण नायरने आपली १५२ धावसंख्या १७५ पर्यंत पोहोचवली आणि कर्नाटक संघाचा पहिला डाव ३०२ धावांवर संपुष्टात आला होता.
1⃣2⃣-1⃣-3⃣5⃣-6⃣! 👌 👌@prasidh43 put on a superb show with the ball as Karnataka secured a first-innings lead against Jammu and Kashmir. 👍 👍 #KARvJK | #RanjiTrophy | @Paytm
Watch that 6⃣-wicket haul 🎥 🔽 pic.twitter.com/Yn9JRIWzOf
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2022
या आव्हानाचा पाठलाग करताना जम्मू- काश्मीर संघाकडून खेळताना कामरान इकबाल (३५) आणि तजीन वाधवान (२५) यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, कृष्णाने त्यांना तंबूत धाडण्याची एकही संधी सोडली नाही. त्याने जम्मू- काश्मीर संघाच्या पहिल्या ७ विकेट्सपैकी ६ विकेट्स स्वत:च्या नावावर केले. कर्नाटक संघाने दुसऱ्या डावात आर समर्थ (६२) आणि देवदत्त पडिक्कल (४९) यांच्या शतकी भागीदारीमुळे चांगली सुरुवात केली. पडिक्कल बाद झाल्यानंतर समर्थ दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बाद झाला आणि संघाने दुसऱ्या डावात २ विकेट्स गमावत १२८ धावा कुटल्या होत्या.
कृष्णाच्या आयपीएल २०२२मधील संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्याला या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
प्रसिद्ध कृष्णाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तो आतापर्यंत फक्त ७ वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याने ४.८४ च्या इकॉनॉमी रेटने एकूण १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये १२ धावा देत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर