सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अव्वलस्थानी आहे. नुकत्याच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर अश्विन याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली होती. आता अश्विनने धक्कादायक खुलासा केला आहे. आर अश्विन पत्नी प्रीती नारायणन हिला काय म्हणालेला हे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
मुलाखतीत आर अश्विन (R Ashwin) म्हणाला की, त्याने पत्नी प्रीती नारायणन (Prithi Narayanan) हिला म्हटले होते की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात होणारी मालिका शेवटची मालिका ठरू शकते.
अश्विनने माध्यमांशी बोलताना आपल्या दुखापतीचा उल्लेख केला. त्याने म्हटले की, “ज्यावेळी मी डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशहून परत आलो, तेव्हा मी माझ्या पत्नीला म्हणालो की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची देशांतर्गत मालिका माझी शेवटची मालिका ठरू शकते. मला गुडघ्याचा त्रास आहे आणि मी ऍक्शनमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.”
तो पुढे म्हणाला की, “बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपासून सूज वाढली होती. त्यानंतर मी 2013-14दरम्यानच्या गोलंदाजी ऍक्शनमध्ये आलो. या दुखापतीसाठी बंगळुरूच्या एनसीएमध्ये गेलो, ज्यानंतर गोलंदाजी सुरू केली आणि गुडघ्याच्या त्रासातूनही आराम मिळाला.” विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अश्विनने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.
अश्विन डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळण्याविषयी म्हणाला की, “याचे उत्तर देणे थोडे कठीण आहे. मात्र, मला अंतिम सामना खेळायला आवडले असते.”
अश्विनच्या गोलंदाजी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 92 कसोटी, 113 वनडे आणि 65 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 474 विकेट्स आहेत. तो अनिल कुंबळे याच्यानंतर भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. याव्यतिरिक्त अश्विनने वनडेत 151 आणि टी20त 72 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer ravichandran ashwin told his wife australia home series could be last tournament)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र…इतकी खराब फिल्डिंग! धावत राहिले फलंदाज, जवळूनही बाद करू शकले नाहीत फिल्डर, पाहा व्हिडिओ
‘मला नाही आवडलं…’, स्टोक्सने पहिल्या दिवशी डाव घोषित करताच संतापले इंग्लंडचे 2 दिग्गज कर्णधार