भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या सर्वांमध्ये भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या पुनरागमनाविषयी मोठी माहिती समोर आली आहे. खरं तर, पंत 30 सप्टेंबर, 2022 रोजी रस्ते अपघातात गंभीररीत्या जखमी झाला होता.
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी!
रिषभ पंत (Rishabh Pant) खूपच वेगाने बरा होत आहे. ही भारतीय संघासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. तसेच, पंतविषयी अशा अफवा पसरल्या होत्या की, त्याला अनेक सर्जरी कराव्या लागल्या आहेत. मात्र, बीसीसीआयशी संबंधित व्यक्तींनी माध्यमांशी बोलताना या गोष्टींना फाट्यावर मारले. ते म्हणाले की, “मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, ज्याप्रकारे अफवा उडाल्या, तशी पंतवर कधीच कुठे सर्जरी झाली नाहीये. त्याच्यावर दर दोन आठवड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. तो अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने बरा होत आहे. त्यामुळे तो वेळेपूर्वीच पुनरागमन करू शकतो.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भासणार पंतची उणीव
भारतीय संघ आयपीएल 2023नंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारताला पंतची उणीव भासेल. पंतने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे. सध्या भारताला त्याच्या जागी योग्य बदली खेळाडू मिळाला नाहीये.
नुकतेच आयपीएल सामन्यात दिसलेला पंत
रिषभ पंत आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान अरुण जेटली स्टेडिअममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या काही सामन्यांमध्ये आधार घेऊन चालताना दिसला होता. पंतबाबत बीसीसीआयच्या एका सूत्राने माध्यमांना असेही सांगितले की, तो आधीपेक्षा चांगला वाटत आहे. त्याला दुसऱ्या सर्जरीची गरज नाहीये. कशाचाही आधार न घेता चालण्यासोबतच पंत आता रिहॅब प्रक्रियेवरही लक्ष देत आहे. अपघातात तो थोडक्यात बचावला होता. पंतच्या लिगामेंटची सर्जरी झाली होती, ज्यानंतर तो वेगाने बरा होत आहे. पंतला यष्टीरक्षण करण्यात आणखी वेळ लागू शकतो. सुरुवातीला तो फलंदाज म्हणून मैदानात उतरू शकतो. (cricketer rishabh pant recovering very fast he does not need another surgery)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलमध्ये टीम इंडियापुढे असेल ‘हे’ आव्हान, रहाणेचं नाव घेत गावसकरांनी स्पष्टच सांगितलं
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर अनिल कुंबळेची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हातापाई…’