इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 66वा सामना पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघात शुक्रवारी (दि. 19 मे) पार पडला. धरमशालेत खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने 4 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह राजस्थान संघ गुणतालिकेत मजबूतरीत्या पाचव्या स्थानी पोहोचला. मात्र, त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा या इतर संघांच्या हातात आहेत. असे असले, तरीही राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या एका फलंदाजाने अशी काही खेळी केली, ज्याची कुणीही अपेक्षा केली नसेल.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा तो फलंदाज इतर कुणी नसून रियान पराग (Riyan Parag) आहे. रियानने पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाविरुद्ध 1 चौकार आणि 2 षटकार मारत संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले. त्याने 12 चेंडूत 20 धावा केल्या. यावेळी रियानचा स्ट्राईक रेट हा 160हून अधिक होता.
इरफान पठाणकडून कौतुक
रियान परागची खेळी पाहून भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण यानेही त्याला पाठिंबा दिला. मात्र, यावेळी इरफानने रियानच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्याने ट्वीट करत लिहिले की, “एखाद्या युवा खेळाडूला त्याच्या क्षमतांवर विश्वास आहे, तर त्याला अनावश्यक द्वेष देऊ नका.”
Don’t give unnecessary hate to a young player just cos he is confident in his ability.
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 19, 2023
खरं तर, रियान पराग संपूर्ण हंगामात फ्लॉप ठरला होता. त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांपासूनच ट्रोल केले जात होते. इतकेच नाही, तर नेटकरी त्याला ‘पनवती’ असेही म्हणत होते. सोशल मीडियावर चाहत्यांनी रियानवर जोरदार मीम्सचाही पाऊस पाडला होता. रियानने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त 78 धावा निघाल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 20 इतकी राहिली आहे, जी त्याने पंजाबविरुद्ध खेळताना केली होती.
रियान परागची कारकीर्द
रियान परागच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 54 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 600 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 56 इतकी आहे. आयपीएलमध्ये त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. रियानने गोलंदाजी करताना 19 डावात 4 विकेट्सही नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट जवळपास 10च्या आसपास राहिला आहे. (cricketer riyan parag finally well played ipl 2023 againts punjab kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफचे स्वप्न भंगताच कॅप्टन धवनने ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, ‘चूक केली…’
बटलरच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण हंगामातच ठरला ‘झिरो’