देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता असूनही त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच, त्यांना दुर्लक्षितही केले जात असल्याचे बोलले जात आहे. या खेळाडूंमध्ये आघाडीवर असणारा विस्फोटक फलंदाज म्हणजे सरफराज खान होय. सरफराजला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही भारतीय संघात संधी मिळत नाहीये. मात्र, त्याने तडाखेबंद खेळीने क्रिकेटविश्वातून वाहवा मिळवली आहे. सरफराज एकापाठोपाठ एक शतक ठोकत भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. अशातच आता सरफराजने मोठे विधान केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तो म्हणाला आहे की, ‘मी कोण आहे दाखवून देईल.’
‘मी कोण आहे दाखवून देईल’
सरफराज खान (Sarfaraz Khan) याने आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्याशी संवाद साधला. यादरम्यान त्याने म्हटले की, “जेव्हा मी 2014मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकातून परतलो आणि 1-2 वर्षे आयपीएल खेळलो, तेव्हा काही लोक म्हणाले की, सरफराज खान मर्यादित षटकांचा खेळाडू आहे. तो लाल चेंडूविरुद्ध खेळू शकणार नाही. मात्र, मला माहिती होते की, मी हे करू शकतो. मी यावर खूप मेहनत घेत आहे. मी फक्त एका संधीची वाट पाहत होतो, जिथे मला रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने खेळण्यासाठी 4-5 सामने मिळू शकतील. त्यामुळे मी विचार केला की, मी त्यांना दाखवून देईल की, मी कोण आहे.”
“तो दिवस आला, जेव्हा मी मुंबईसाठी पुनरागमन केले. मुंबईसाठी माझे पहिले शतक थेट तिसऱ्या शतकावर जाऊन संपले. त्यानंतर मला जाणवले की, गोष्टी तितक्या कठीण नाहीयेत, जितक्या लोक त्या बनवतात. माझेही बालपणापासून स्वप्न होते की, मी माझ्या एकट्याच्या जोरावर मुंबईच्या लोकांसोबत आपल्या हातात बॅट आणि हेल्मेट उचलेल. त्यामुळे त्या गोष्टीची चव कधीच संपणार नाही. तसेच, मीदेखील ती चव कधीच जाऊ देणार नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
एबी डिविलियर्ससोबतच्या संभाषणाचा खुलासा
सरफराजने एबी डिविलियर्ससोबत त्याच्या संभाषणाचा खुलासाही केला. यावेळी त्याने दावाही केला की, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने त्याला सांगितले की, तो त्याच्या वयात मुंबईच्या युवा खेळाडूप्रमाणे प्रतिभावान खेळाडू नव्हता. सरफराज म्हणाला की, “एबी मला म्हणाला की, आपण त्याबद्दल न बोललेलंच बरं आहे. कदाचितच मी त्याला कधी सराव करताना पाहिले आहे. मात्र, मी एकदा त्याला विचारले की, तू जास्त सराव का करत नाही? तेव्हा तो म्हणाला की, ‘जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा मी खूप सराव करायचो. खूप सराव कर. तू आता जितका प्रतिभावान आहे, तितका प्रतिभावान मी नव्हतो. त्यामुळे फक्त खेळत राहा.'”
सरफराजची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी
सरफराज खान याच्या देशांतर्गत कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 37 सामने खेळले आहेत. त्यातील 54 डावात फलंदाजी करताना त्याने 79.65च्या सरासरीने 3505 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याची ही सरासरी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरची दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. अशात त्याची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात त्याला संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (cricketer sarfaraz khan gave big statement on critics said i will show them who i am)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीच संजू सॅमसनचं नशीब फळफळलं! थेट ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी
खराब गोलंदाजीमुळे बुमराहवर भडकलेला विराट, पण ‘या’ भारतीयाने मध्यस्थी करत म्हटले होते, ‘त्याला सोड…’