सध्या जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा चांगलाच दबदबा असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान हा वनडे क्रिकेटमधील सध्याचा शानदार संघ आहे. याचा प्रत्यय आयसीसी क्रमवारीवरून येतो. पाकिस्तानने संघांच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. हे शक्य होण्यामागील एक कारण पाकिस्तानचे भेदक वेगवान गोलंदाजही आहेत. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार सांभाळत आहे. अशातच त्याच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. आफ्रिदी सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळतोय. ही स्पर्धा संपल्यानंतर तो लगेच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.
शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्न करणार
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने फलंदाजांना क्लीन बोल्ड करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, तो शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची लेक अंशा आफ्रिदी (Ansha Afridi) हिच्या प्रेमात स्वत:ला क्लीन बोल्ड होण्यापासून वाचवू शकला नाही. खरं तर, शाहीनने याच वर्षी माजी फेब्रुवारीमध्ये क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मुलीसोबत संसार थाटला होता. मात्र, हे लग्न आफ्रिदी ट्रायबल परंपरेनुसार पार पडला, ज्यात त्याच्या जवळच्या लोकांनी भाग घेतला होता.
मात्र, यावेळी पाकिस्तान संघासोबतच इतर नातेवाईकांचीही इस्लामाबाद येथे गर्दी पाहायला मिळेल. शाहीन आफ्रिदी 19 सप्टेंबर रोजी लग्न करेल, तर 21 सप्टेंबर रोजी इस्लामाबादमध्ये येथे रिसेप्शन दिले जाईल, असे सांगितले जात आहे.
https://twitter.com/babarazamking_/status/1699872387624284649
आशिया चषकात आफ्रिदीचा कहर
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत ज्या संघाचा सामना केला आहे, त्यात सर्व संघांना सर्वबाद केले आहे. या यादीत बलाढ्य भारतीय संघाच्या जबरदस्त फलंदाजी फळीचाही समावेश आहे. वेगवान गोलंदाज आफ्रिदी या स्पर्धेत गोलंदाजीतून आग ओकताना दिसत आहे.
आफ्रिदीने स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 14.86च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानचा पुढील सामना येत्या रविवारी (दि. 10 सप्टेंबर) भारताविरुद्ध कोलंबो येथे खेळला जाणार आहे. अशात या सामन्यात पुन्हा एकदा आफ्रिदीच्या गोलंदााजीचा जलवा पाहायला मिळू शकतो. (cricketer shaheen afridi will marry ansha afridi on september 19 after asia cup 2023)
हेही वाचाच-
न्यूझीलंडचा इंग्लंडला दे धक्का! कॉनवे-मिचेलच्या नाबाद शतकांनी पार केला 292 धावांचा पहाड
‘कमबॅक मॅच’मध्ये स्टोक्सचा जलवा! शानदार अर्धशतकाने सावरला इंग्लंडचा डाव, बटलर-लिव्हिंगस्टोनचाही तडाखा