ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू टीम डेविड आयपीएल 2023 स्पर्धेसाठी आपल्या मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. शनिवारी (दि. 25 मार्च) तो मुंबईत दाखल झाला. यानंतर टीम डेविडचे मराठी अंदाजात स्वागत करण्यात आले. यादरम्यानचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
खरं तर, या व्हिडिओत टीम डेविड (Tim David) हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्याला बसवून डोक्यावर फेटा बांधला जातो. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘ऐका दाजीबा’ हे मराठी गाणेही वाजत आहे. डेविडला फेटा बांधताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्यही झळकल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
मुंबईने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत भन्नाट कॅप्शन दिले आहे. मुंबईने कॅप्शनमध्ये “पलटण ऐका, टीम भाऊ आला रे” असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 18 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि 1 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CqMtxRDD71o/
एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “तोड-फोड मित्र मंडळ.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “टीम भाऊ हा फेट्यात एकदम मराठी मुलासारखा दिसतोय.” आणखी एकाने लिहिले की, “एकच छावा.”
टीम डेविडविषयी थोडक्यात
टीम डेविड हा सध्याच्या घडीला टी20 क्रिकेटमधील सर्वात खतरनाक खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2021मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळताना केली होती. यानंतर आयपीएल 2022साठी झालेल्या मेगा लिलावात मुंबईने त्याला 8.25 कोटी रुपये मोजत संघात सामील केले होते. मागील हंगामात त्याने मुंबईसाठी 8 सामने खेळले. त्यात त्याने 216.28च्या स्ट्राईक रेटने 186 धावा चोपल्या. त्याच्या शानदार खेळीने प्रभावित होऊन मुंबईने आयपीएल 2023च्या मिनी लिलावापूर्वी त्याला रिटेन केले होते.
टीम डेविडची आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द
टीम डेविड हा 27 वर्षीय असून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीची सुरुवात सिंगापूरकडून खेळताना केली होती. मात्र, सध्या तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत 25 सामने खेळले आहेत. त्यात 37च्या सरासरीने 740 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने बॅटमधून 5 अर्धशतकेही ठोकली आहेत. तसेच, नाबाद 92 धावांची वादळी खेळीही साकारली आहे. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 5 विकेट्सही घेतल्या आहेत. (cricketer tim david gets grand welcome joins mumbai indians camp ahead of ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी हक्कदार नव्हतेच…’, WPLची पहिली हॅट्रिक घेणारी इझी वोंग असे का म्हणाली?
IPL 2023 । अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवले? प्रशिक्षक रिकी पाँटिंगने दिले ‘हे’ उत्तर