---Advertisement---

लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

MS-Dhoni-And-Virat-Kohli
---Advertisement---

क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू आहेत, जे कितीही आक्रमक असले, तरीही ते मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपली मैत्री टिकवून ठेवतात. भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्याबाबतही असंच काहीसं आहे. हे दोघेही सध्या आयपीएल २०२२मध्ये खेळत आहेत. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतोय, तर धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतोय. मात्र, उभय संघात नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, विराटने धोनीला शिवीगाळ केली आहे.

खरं तर सामन्याच्या १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोश हेजलवूडने (Josh Hazlewood) एमएस धोनीला (MS Dhoni) रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) हातून बाद केले. पाटीदारने झेल घेताच विराट कोहली (Virat Kohli) रागाने पेटला. यादरम्यान त्याची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. धोनी बाद होताच, तो इतका आक्रमक झाला की, तो अपशब्द वापरताना दिसला. विराटची ही रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. त्याच्या अशा रिऍक्शननंतर चाहत्यांनी विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहिले की, “अस्वीकार्य, तो खरंच भारतीय सेना, विशेषत: धोनीला शिवी देत आहे. मला नेहमीपासूनच माहितीये की, विराट देशद्रोही आहे.”

https://twitter.com/SirDindaTweet/status/1521912894681600000?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521912894681600000%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-virat-kohli-blasted-for-aggressive-celebration-after-ms-dhoni-dismissal-during-rcb-vs-csk-ipl-2022-match-6428858.html

याव्यतिरिक्त आणखी एका युजरने लिहिले की, “विराटच्या विकेटनंतरचे दृश्य आणि धोनीच्या विकेटनंतरच्या दृश्यांमध्ये फरक जाणवतो. विराट कोहलीचा चाहता म्हणून त्याच्याकडून हे वर्तन अनपेक्षित आहे. ही असभ्य भाषा न वापरून तो विकेटचा आनंद साजरा करू शकला असता. क्रिकेटच्या खेळात मैदानावर वर्तणूक महत्त्वाची असते.”

https://twitter.com/Iamrahul8787/status/1521932914182672385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521932914182672385%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fvirat-kohli-slammed-for-aggressive-celebration-after-ms-dhoni-s-dismissal-during-rcb-vs-csk-ipl-2022-match-watch-video-101651687244886.html

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बुधवारी (दि. ०४ मे) बेंगलोर आणि चेन्नई आमने- सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने ८ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. यावेळी आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाला ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या. यामुळे चेन्नईला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, यादरम्यान चेन्नईकडून फलंदाजी करताना धोनी फक्त २ धावा करून तंबूत परतला. यावेळी धोनी बाद होताच विराट आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. यावेळी त्याच्या ओठांची रिऍक्शन पाहून असे दिसले की, तो धोनीला शिवी देतोय. नेटकरीही म्हणत आहेत की, विराटने खरंच धोनीला शिवी दिली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीमुळेच चेन्नई प्लेऑफमधून गेली बाहेर? ‘या’ खेळाडूला बाहेर करणं पडलं महागात

भारतीय संघाने २०१९ विश्वचषक का गमावला? खुद्द युवराज सिंगने सांगितले कारण

एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---