भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. त्यांचे बालपणी, जुने-नवीन असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आता या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये भारतीय खेळाडूंचे एक वेगळेच रूप समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI याचा वापर करून भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे खेळाडू जर महिला असते, तर ते कसे दिसले असते, याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
एका आर्टिस्ट AI टूलच्या मदतीने भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचे चेहरे महिलांच्या रूपात दाखवले आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. खरं तर, आर्टिस्ट एसके एमडी अबू साहिद याने मिडजर्नी नावाच्या एका टूलचा वापर करून भारतीय क्रिकेटपटूंचे लिंग बदलून त्यांचा महिलांच्या रूपातील फोटो तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
क्रिकेटपटूंची नावेही महिलांची
सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या AI फोटोंची खासियत अशी आहे की, सर्व खेळाडूंचे नावही मुलींप्रमाणे ठेवले आहेत. त्यात, विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव विद्या कोहली (Vidya Kohli), शुबमन गिलचे नाव सुभद्रा गिल आणि महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याचे नाव माही सिंग धोनी ठेवले आहे. इतर खेळाडूंची नावेही अशाचप्रकारे ठेवली आहेत.
विराट आणि धोनीसह इतर क्रिकेटपटूंचे फोटो
साहिद या आर्टिस्टने प्रत्येक फोटोच्या खाली पुरुष क्रिकेटपटूचे नाव लिहिले आहे. फोटो आणखी रंजक बनवण्यासाठी साहिदने क्रिकेटपटूंना महिलांची नावेही दिली आहेत. यामध्ये साहिदने एमएस धोनी, विराट कोहली, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा यांसह अनेक नावांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/Cr2myopvLGp/?utm_source=ig_embed&ig_rid=b774b2a5-f798-4ab1-a207-6df3e1916729
पोस्ट तुफान व्हायरल
साहिद या आर्टिस्टने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर दोन हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, नेटकरी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, त्यांना हे फोटो दोन-तीनवेळा पाहावा लागले, तेव्हा कुठे त्यांना खेळाडू ओळखता आले. तसेच, इतर युजर्स आर्टिस्टच्या कलाकृतीचे कौतुक करत आहेत. (cricketer virat kohli to ms dhoni know here how indian cricketers will look as women ai generated image)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो RCBसोबत गल्ली क्रिकेट…’, सूर्याची विस्फोटक खेळी पाहून गावसकरांचे लक्षवेधी भाष्य, वढेराचेही कौतुक
वढेराच्या षटकारामुळे टाटा टियागोचे नुकसान, तरीही टाटाच देणार 5 लाख रुपये, ‘हे’ आहे कारण