भारतीय संघाचा विश्वासू फिरकीपटू युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. युझवेंद्रचा राजस्थान संघ स्पर्धेतील 5 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. संघाच्या या कामगिरीमागे आयपीएलमधील एका नवीन नियमाचा हात आहे. त्याचबाबत आता चहलने मोठे भाष्य केले आहे. चला तर जाणून घेऊयात काय म्हणालाय चहल…
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने मंगळवारी (दि. 18 एप्रिल) दावा केला की, ‘इम्पॅक्ट प्लेअर‘ (Impact Player) नियमामुळे मागील हंगामाच्या तुलनेत गतविजेता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला खूपच फायदा झाला आहे. राजस्थान संघाने सुरुवातीच्या पाचपैकी 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
नवीन नियमामुळे राजस्थानचे गोलंदाज ऍडम झम्पा (सीएसकेविरुद्ध 43 धावा खर्च करत 1 विकेट), मुरुगन अश्विन (दिल्लीविरुद्ध 11 धावा खर्च) आणि नवदीप सैनी (हैदराबादविरुद्ध 34 धावा खर्च) हे खेळाडू प्रभाव सोडण्यात अपयशी ठरले. मात्र, फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
गुवाहाटी येथे ध्रुव जुरेल याने पंजाब किंग्सविरुद्ध 15 चेंडूत नाबाद 32 धावांची महत्त्वाची खेळी साकारली. तसेच, संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. मात्र, शेवटी राजस्थानला 5 धावांनी नजीकचा पराभव पत्करावा लागला. देवदत्त पडिक्कल याने यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध 26 धावांची महत्त्वाची खेळी साकारत राजस्थानला गुजरातविरुद्ध हंगामातील आपला चौथा सामनाही जिंकून दिला.
पाच सामन्यात दोन वेळा ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम वापरून बाहेर जाणाऱ्या चहलने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी भाष्य केले. तो म्हणाला की, “ध्रुव आणि देवदत्त यांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आमच्या बाजूने जात आहे. हे फायदेशीर आहे. कारण, बॅटमध्ये माझे काहीही काम नाही. जेव्हा तुम्ही मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असता, तेव्हा अतिरिक्त फलंदाज सामील झाल्याने मदत मिळते, जी फायद्याची स्थिती असते.”
राजस्थानने पहिले दोन ‘घरगुती’ सामने गुवाहाटी येथे खेळले. त्यानंतर आता बुधवारी (दि. 19 एप्रिल) या हंगामात राजस्थान लखनऊविरुद्ध पहिल्यांदा आपले घरचे मैदान म्हणजेच सवाई मानसिंग स्टेडिअमवर खेळणार आहे. चहल म्हणाला की, “हे मैदान मोठे आहे, त्यामुळे फिरकीपटूंसाठी मी खूप खुश आहे.”
विशेष म्हणजे, राजस्थान 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे, तर लखनऊ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (cricketer yuzvendra chahal claims new ipl rule of impact substitute has worked well for rajasthan royals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुनमध्ये महान फलंदाज गावसकरांना दिसली सचिन तेंडुलकरची ‘ही’ खास झलक, स्वत:च केला खुलासा
ब्रेकिंग! माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू