जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानला जाणारा पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीआनो रोनाल्डो याने आपल्या कारकीर्दीविषयी शुक्रवारी (२७ ऑगस्ट) मोठा निर्णय घेतला. तब्बल बारा वर्षांच्या काळानंतर रोनाल्डो पुन्हा एकदा आपला माजी क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी खेळताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच मँचेस्टर युनायटेड व प्रीमियर लीगच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात आली.
बारा वर्षानंतर खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
लिओनेल मेस्सीसह जगातील सध्याचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्टीआनो रोनाल्डोने शुक्रवारी पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेडसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. मँचेस्टर युनायटेडचे माजी मॅनेजर सर ऍलेक्स फर्ग्युसन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपण पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेडच्या पारंपारिक लाल जर्सीत खेळणार असल्याचे स्पष्ट केले. रोनाल्डोने किती रुपयांचा करार केला याबाबत अद्याप घोषणा झाली नाही. सर्व वैद्यकीय चाचण्या व स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंमतीबाबत सांगितले जाईल.
Welcome 𝗵𝗼𝗺𝗲, @Cristiano 🔴#MUFC | #Ronaldo
— Manchester United (@ManUtd) August 27, 2021
जुवेंटसला केला रामराम
रोनाल्डो सध्या इटलीमधील प्रमुख फुटबॉल क्लब युवेंटससाठी खेळत होता. २०१८ मध्ये युवेंटस संघात समाविष्ट होण्याआधी त्याने २००९ ते २०१८ याकाळात स्पॅनिश क्लब रियल माद्रिदचे प्रतिनिधित्व केले होते. रोनाल्डो याला जागतिक स्तरावर सर्वप्रथम ओळख ही मँचेस्टर युनायटेडसाठी खेळतानाच मिळाली होती. त्याने २००३ ते २००९ या काळात मँचेस्टर युनायटेडसाठी खेळताना १९६ सामन्यात ८४ गोल झळकावलेले.
वर्तमानातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू आहे रोनाल्डो
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालचे नेतृत्व करणारा रोनाल्डो जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू मानला जातो. ३६ रोनाल्डोने आत्तापर्यंत फुटबॉलविश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा म्हटला जाणारा ‘बॅलोन डी ऑर’ पुरस्कार पाचवेळा जिंकला आहे. मँचेस्टर युनायटेडसोबत करारबद्ध होण्यापूर्वी तो मँचेस्टर सिटीशी जोडला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ष १९६२ च्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या फुटबॉलरचे निधन
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी
अतिशय दुर्दैवी! अफगानी फुलबॉलपटूचा विमानातून कोसळून मृत्यू, तालिबानींच्या भितीने सोडत होता देश