आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान राजस्थानने उत्कृष्ट खेळ दाखवत 32 धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी पुन्हा एकदा पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर भरारी घेतली. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे दिवस आठवले.
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला,
‘पावर प्लेमध्ये आम्ही काहीसा धीमा खेळ दाखवला. राजस्थानने चांगली कामगिरी केल्याने त्यांना विजय मिळवता आला. मला जयपुरमध्ये यायला नेहमी आवडते. माझ्या वनडे कारकीर्दीवेळी विशाखापट्टणम येथील पहिल्या शतकाने मला 10 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी निर्माण केली होती. मात्र, जयपुर येथील 183 धावांच्या खेळीमुळे मला आणखी वर्षभर संघातील आपली जागा टिकवता आली..
धोनीने आपल्या वनडे कारकीर्दीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध जयपूर येथेच 183 धावांची वादळी खेळी केली होती. 145 चेंडूंचा सामना करताना त्याने 15 चौकार व 10 षटकार ठोकलेले.
राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याचा विचार केला गेल्यास राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय युवा फलंदाजांनी योग्य ठरवला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने तडाखेबंद अर्धशतक साजरे केले. जोस बटलर व संजू सॅमसन यांनी देखील महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, ध्रुव जुरेल व देवदत्त पडिक्कलने आक्रमक फलंदाजी करत संघाला 202 पर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीपासून धावांचा वेग राखता आला नाही. ऋतुराज गायकवाड याने चेन्नईचा डाव उभा करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस शिवम दुबे याने देखील फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. मात्र, राजस्थानच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे त्यांना अपयश आले.
(CSk Captain Nostalgic After Match Against Rajasthan Royals At Sawai Mansingh Stadium Jaipur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रोहित मानसिकदृष्ट्या थकलाय”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली हिटमॅनची परिस्थिती
रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके पुन्हा अपयशी! शानदार विजयासह राजस्थान पुन्हा नंबर वन