चेन्नई सुपर किंग्स संघ इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (आयपीएल) नवा कर्णधार रविंद्र जडेजा याच्या नेतृत्वाखाली संघर्ष करताना दिसत आहे. आता त्यातच अशी बातमी समोर येत आहे की चेन्नईचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने बायोबबल सोडला असून तो दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाला आहे. तो आता एक आठवड्यानंतर पुन्हा संघात सामील होईल.
अशी माहिती मिळत आहे की, न्यूझीलंडचा क्रिकेटपटू असलेला कॉनवे (Devon Conway) लग्नासाठी भारताबाहेर चालला (Leave Bio-bubble for Wedding) असून साधारण एक आठवड्यात पुन्हा संघात सामील होईल. त्याची अनुपस्थिती चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) फार मोठा धक्का मानले जात नाहीये, कारण आत्तापर्यंत कॉनवे केवळ एकच सामना खेळला आहे. दरम्यान, तो आता पुन्हा जेव्हा भारतात येईल, तेव्हा त्याला पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागेल, त्यानंतरच तो चेन्नई संघात दाखल होईल.
कॉनवेसाठी झालेली प्री-वेडींग पार्टी
काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सने डेवॉन कॉनवेसाठी प्री-वेडींग पार्टीचे (Pre-Wedding Party) आयोजन केले होते. यामध्ये संघातील खेळाडूंसह अन्य सदस्यही सामील झाले होते. खेळाडू पारंपारिक दाक्षिणात्य वेषात दिसत होते. यावेळी कॉनवेने केकही कापला होता. तसेच खेळाडूंनी त्याच्यासोबत डान्सही केला होता. याबरोबरच कॉनवेची होणारी पत्नी किम वॉटसन ही व्हिडिओ कॉलद्वारे या पार्टीत सामील झाली होती.
त्याच्या प्री-वेडींग पार्टीचा व्हिडिओ देखील चेन्नई सुपर किंग्सकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिजिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
Now showing – Kim & Conway Wedding Cassette 📼!
📹👉 https://t.co/oYBPQHs25f!#WeddingWhistles #Yellove 🦁💛 pic.twitter.com/pTLdQgTa5n— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2022
चेन्नईची कामगिरी
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम आत्तापर्यंत फारसा चांगला राहिलेला दिसत नाही. त्यांनी आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून त्यातील ५ सामने पराभूत झाले आहेत. तसेच एकच सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे चेन्नईसमोर विजयी मार्गावर परतण्याचे आव्हान आहे.
त्यातच या हंगामापूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोडले होते. त्यामुळे कर्णधारपदाची धूरा चेन्नईने रविंद्र जडेजाकडे सोपवली. याचमुळे आयपीएल २०२२ मध्ये जडेजा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसत आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
चेन्नईला आता त्यांचा सातवा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) हा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स देखील विजयाती प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न करेल. त्यांनाही अद्याप आयपीएल २०२२ मध्ये विजय मिळवता आलेला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा
IPL2022| चेन्नई वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!