मंगळवारचा (दि. 23 मे) दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर या दिवशीच खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हे चेन्नई सुपर किंग्स संघाचे घरचे मैदान (होम ग्राऊंड) आहे. त्यामुळे त्यांचे सामन्यातील पारडे जड मानले जात आहे. मात्र, हरभजन सिंग याचे याविषयी वेगळे मत आहे. त्याच्या मते, चेन्नई संघ यावर्षी त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वोत्तम खेळ दाखवू शकला नाही. या चार वेळच्या चॅम्पियन संघाने या मैदानावर सातपैकी 4 सामने जिंकले आहेत.
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी चेपॉक मैदानावर पराभूत केले आहे. पंजाब आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या तोंडचा विजय निसटला होता. गुजरात टायटन्सविरुद्धही त्यांचे प्रदर्शन तितके चांगले नव्हते. चेन्नईला गुजरातविरुद्धच्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. तरीही हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा विश्वास आहे की, चेन्नई प्ले-ऑफमध्ये चांगली कामगिरी करेल.
हरभजन सिंग याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात होणारा सामना काट्याची टक्करचा होईल. कारण, दोन्ही संघांना माहितीये की, मोठे सामने कसे जिंकतात. चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानावर खेळण्याचा मोठा फायदा आहे. त्यांना परिस्थिती चांगल्याप्रकारे समजतात, पण हेदेखील आहे की, घरच्या मैदानावर त्यांचे प्रदर्शन यावर्षी खूप चांगले राहिले नाहीये. मी या सामन्याविषयी खूपच उत्साहित आहे.”
हरभजन असेही म्हणाला की, डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना गुजरातविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल. तो म्हणाला, “ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांना मैदानावर पूर्ण तयारीनिशी उतरावे लागेल. ते या हंगामात एकमेकांसाठी पूरक म्हणून खेळत आहेत.”
“त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली सुरुवात दिली आहे. त्यांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. ज्या संघांच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, ते जास्त धावा बनवत आहेत. त्यामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत आहे,” असेही पुढे बोलताना हरभजन म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 14पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्यांना एक गुण मिळाला. अशाप्रकारे त्यांचे 17 गुण झाले. ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून त्यांचा पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (csk has not performed its best on chepauk says former cricketer harbhajan singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक दोन नव्हे तब्बल 12 दिग्गजांना धोनीने ठरवले चूक! नक्की काय घडले वाचाच
बोंबला! ‘या’ 3 कारणांमुळे थेट फायनलमध्ये पोहोचू शकतो Gujarat Titans संघ, धोनीसेनेच्या अडचणी वाढणार