मुंबई । आयपीएलमध्ये आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला दिलासा देणारी बातमी मिळाली. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
ऋतुराज गायकवाड युएईला दाखल झाल्यानंतर थोड्या वेळातच त्यांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला. त्यानंतर त्याला त्याच्या खोलीत अलग ठेवण्यात आले.
ऋतुराजला संघात सामील होण्यासाठी अजून थोडे थांबावे लागेल. पुढील 24 तास त्याच्यावर पुन्हा चाचणी केली जाईल आणि अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्याला खोली सोडण्याची मुभा दिली जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेस दोन ते तीन दिवस लागतील, याचा अर्थ असा की भारताचा हा स्टार खेळाडू पहिल्या काही सामन्यांमध्ये संघाचा भाग असणार नाही. सुरेश रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्याच्या निर्णयाच्या नंतर ऋतुराजला सीएसकेसाठी फार महत्वाचे मानले जात होते.
ऋतुराज व्यतिरिक्त दीपक चहर देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले, परंतु त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तो संघात दाखल झाला. तो पहिल्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे.