आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या चांगल्या सुरुवातीनंतरही अनुभवी रवींद्र जडेजा याने किफायतशीर गोलंदाजी करत राजस्थानला रोखण्याचे काम केले. यासोबतच त्याने आपल्या टी20 कारकिर्दीतील एक खास टप्पा देखील पार केला.
चालू हंगामात जडेजा गोलंदाजी चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने हा फॉर्म या सामन्यातही तसाच ठेवला. राजस्थानचा डाव वेगाने पुढे घेऊन जात असलेल्या देवदत्त पडिक्कल याला त्याने बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला खातेही खोलू न देता तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुढील चेंडूवर मोईन अलीकडून झेल सुटल्याने त्याची हॅट्रिक हुकली. जडेजाने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 2 बळी आपल्या नावे केले. त्याच्यामुळे एकवेळ राजस्थानचा 200 पार जाऊ वाटणारा डाव 175 पर्यंत मर्यादित राहिला.
जडेजाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 64 सामने खेळताना 51 बळी मिळवले आहेत. तर आयपीएलमध्ये त्याच्या नावे 214 सामन्यात 138 बळी टिपलेत. तर, उर्वरित 11 बळी सौराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना घेतले आहेत.
जडेजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2008 मध्ये राजस्थान रॉयल्ससह केली होती. त्यानंतर त्याने कोची टस्कर्स केरळ व गुजरातला लायन्स संघाचे देखील प्रतिनिधित्व केलेले. जडेजा चेन्नईसाठी आयपीएलमध्ये 100 पेक्षा जास्त बळी मिळवणारा ड्वेन ब्राव्होनंतर केवळ दुसरा गोलंदाज आहे. तसेच, आयपीएलमध्ये 2000 धावा व 100 बळी मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरतो.
(CSK Vice Captain Ravindra Jadeja Complete 200 Wickets In T20 Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाशिक द्वारका डिफेंडर्सचा सलग तिसरा विजय
अटीतटीच्या लढतीत परभणी संघाचा विजय तरीही टॉप 4 मधून बाहेर