---Advertisement---

चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा

On: शनिवार, मे 27, 2023 6:28 PM
Chennai-Super-Kings
---Advertisement---

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये सीएसकेने गुजरातला पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. तसेच, गुजरातने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्स संघाला 62 धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम सामन्यात पुन्हा चेन्नईविरुद्ध भिडण्याचा बंदोबस्त केला. मात्र, सीएसके संघाला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांच्या 5 खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन करणे गरजेचे आहे.

कोण आहेत ते 5 खेळाडू?
ऋतुराज गायकवाड
भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात 4 अर्धशतकांच्या जोरावर 564 धावा केल्या आहेत. यावर्षी चेन्नईच्या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋतुराजचाही समावेश होतो. अशात चेन्नईला त्याच्याकडून अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

डेवॉन कॉनवे
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे (Devon Conway) यानेही आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 15 सामन्यात 52.08च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अशात अंतिम सामन्यातही चेन्नईला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

रवींद्र जडेजा
अंतिम सामन्यात बाजी मारायची असेल, तर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जबरदस्त कामगिरी करणे खूपच गरजेचे आहे. जडेजा गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. या हंगामात त्याने 15 सामन्यात 19 विकेट्स घेण्यासोबतच 175 धावांचा पाऊसही पाडला आहे. अशात जडेजा अंतिम सामन्यात धमाल कामगिरी करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दीपक चाहर
सीएसके (CSK) आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) त्याच्या खतरनाक स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुरुवातीच्या षटकात चाहरविरुद्ध खेळणे खूपच कठीण असते. त्याने या हंगामात 9 सामने खेळताना 12 विकेट्स घेतल्या आहेत. तो अंतिम सामन्यातही गुजरातच्या सलामीवीरांना बाद करण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो.

मथीशा पथिराना
श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याच्यासाठी आयपीएल 2023 हंगाम एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात 17 विकेट्स घेण्याची किमया केली आहे. त्याने या हंगामात चेन्नईच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जर तो अंतिम सामन्यात गुजरातविरुद्ध चमकला, तर सीएसकेला पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात जास्त समस्या येणार नाही. (csk vs gt chennai super kings 5 players shine ipl 2023 final know about them)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या गोलंदाजांना चोपल्यानंतर दमदार गिलचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी टी20 वर्ल्डकपनंतर…’
Video : अबू धाबीतील खास सोहळ्यासाठी पृथ्वी शॉने गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, सर्वत्र रंगलीय चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---