इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात सीएसकेचा सलामी फलंदाज डेवॉन कॉनवे याने खास कामगिरी केली. कॉनवे अशी कामगिरी करणारा आयपीएल 2023 हंगामातील पाचवा खेळाडू बनला. चला तर कॉनवेने नेमका काय विक्रम केलाय, सविस्तर जाणून घेऊयात.
मंगळवारी (दि. 23 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी डावाची सुरुवात केली. सामन्यात कॉनवेने 34 चेंडूत 40 धावा केल्या. या सामन्यात त्याने 15 धावा करताच त्याच्या आयपीएल 2023मधील 600 धावांचा टप्पा पार झाला. त्यामुळे तो अशी कामगिरी करणारा हंगामातील पाचवा फलंदाज ठरला.
हंगामात 600 धावा करणारे 5 फलंदाज
पहिल्या क्वालिफायर सामन्यापर्यंत हंगामात सर्वाधिक 600 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 5 धुरंधरांचा समावेश आहे. या यादीत फाफ डू प्लेसिस 730 धावांसह पहिल्या स्थानी आहे. तसेच, 680 धावांसह शुबमन गिल दुसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त विराट कोहली तिसऱ्या स्थानी असून त्यानेही 639 धावा केल्या आहेत. युवा फलंदाज यशस्वी जयसवाल चौथ्या स्थानी असून त्याने 625 धावा केल्या आहेत.
डेवॉन कॉनवेची हंगामातील कामगिरी
डेवॉन कॉनवे याने आयपीएल 2023 स्पर्धेत पहिल्या क्वालिफायरपूर्वी 14 सामने खेळताना 585 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश.
सीएसके संघाची साखळी फेरीतील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023च्या साखळी फेरीत एकूण 14 सामने खेळले. या सामन्यांपैकी 8 सामन्यात चेन्नईला विजय मिळवण्यात यश आले. तसेच, 5 सामन्यात पराभवही पत्करावा लागला. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे चेन्नई संघ 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. आता पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई संघ गुजरातला पराभूत करून अंतिम सामन्यात एन्ट्री करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Devon Conway completed 600 Runs in IPL 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक-दोन नाही हंगामातील 10 सामन्यात धोनीने दाखवलं धाडस, गुजरातविरुद्ध उतरवली आपली खास प्लेइंग इलेव्हन
Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?