आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यष्टीमागून विकेटसाठी अपील करायचा, तेव्हा भल्याभल्या खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळायचा. आता धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अजूनही खेळताना दिसतोय. या स्पर्धेतही त्याचे यष्टीमागून विकेटसाठी अपील करणे काही बंद झाले नाहीये. यावेळी आता खेळाडूंचा सोडाच, खुद्द मैदानावर उपस्थित पंचाचाही आत्मविश्वास डळमळल्याचे दिसले आहे. यामुळे पंचांनी वाईड असलेला चेंडू सोडत थेट फलंदाजालाच बाद घोषित केले.
गुरुवारी (दि. १२ मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indian And Chennai Super Kings) संघात आयपीएल २०२२चा ५९वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने सर्वबाद ९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान १४.५ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
मात्र, चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या डावाच्या सहाव्या षटकातच पंचांनी हा निर्णय बदलला होता. झाले असे की, सहाव्या षटकाचा तिसरा चेंडू होता आणि सिमरजीत गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्ट्राईकवर ऋतिक शोकीन (Hrithik Shokeen) होता. चेंडू लेग स्टंपच्या जवळून धोनीच्या हातात गेला. त्यामुळे असे वाटले की, आवाज आला आहे. यावेळी पंचा आधी चेंडू वाईड देण्याचा विचार करत होते. मात्र, तेव्हाच एमएस धोनी (MS Dhoni) याने अपील केली आणि पंचांनीही वाईड देण्याचा निर्णय बदलत फलंदाजाला बाद घोषित केले.
https://twitter.com/sportsgeek090/status/1524793113436618752?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524793113436618752%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fcricket%2Freport-ipl-2022-csk-vs-mi-umpire-changes-signal-from-wide-to-out-netizens-call-it-ms-dhoni-impact-2952594
मुंबई इंडियन्सकडे डीआरएस होता आणि त्यावेळी शोकीननेही डीआरएस घेतला. यावेळी अल्ट्राएजमध्ये दिसल्यानंतर समजले की, चेंडू पॅडला लागला होता आणि यामध्ये बॅटीचा काहीही समावेश नव्हता. मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांना लगेच आपला निर्णय बदलावाल लागला. यामुळे सोशल मीडियावरही त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आले.
Umpire raised the finger only because of dhoni there 😭🤣
— arfan (@Im__Arfan) May 12, 2022
This is purely Dhoni's wicket😂
Umpire while giving wide, saw dhoni appealing and raised one hand and gave out to that extension to that wide🤦🏻♂️Umpiring level can't be more poor now!!! #IPL2022
— Mohit Bararia 🇮🇳🏏 (@MohitBararia7) May 12, 2022
I swear, the umpire wanted to give wide and then saw Dhoni appealing and gave it out.
— ParteekNotPrateek (@randomcricfacts) May 12, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई इंडियन्सने हा सामना जरी जिंकला असला, तरीही त्यांच्या या विजयामुळे चेन्नई संघ मात्र आयपीएलमधून बाहेर झाला. चेन्नई आणि मुंबई हे दोन्हीही आयपीएलमधील बलाढ्य संघ आहेत. मात्र, त्यांना या हंगामात खास कामगिरी करता आली नाही. हे दोन्ही संघ आयपीएलमधून बाहेर पडले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’