मंगळवारी (दि. १२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२चा २२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील. स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने बेंगलोरला २३ धावांनी नमवत विजयाचं खातं उघडलं. भारतीय क्रिकेट संघाचा आणि बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या हंगामात खराब फॉर्मशी झगडत आहे. अशीच काहीशी परिस्थिती चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडची आहे. बेंगलोर विरुद्ध चेन्नई संघात झालेल्या सामन्यातही ऋतुराज संघर्ष करताना दिसला. या सामन्यानंतर विराटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. तो सामन्यानंतर ऋतुराजशी बोलताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२१मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने १६ सामने खेळताना सर्वाधिक ६३५ धावा चोपल्या होत्या. यासोबतच त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले होते. मात्र, यंदाच्या हंगामातील त्याची काामगिरी खूपच खराब आहे. या हंगामात त्याने ५ सामने खेळले असून त्यात त्याने केवळ ३५ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सामन्यानंतर ऋतुराजशी बोलताना दिसला विराट
बेंगलोर संघाला चेन्नईने आयपीएल २०२२मधील पहिला विजय नोंदवला. सामन्यानंतर विराट ऋतुराजशी बोलताना दिसला. यावेळी विराटने ऋतुराजला प्रेरितही केले. दोन्ही खेळाडूंचा चर्चा करतानाचा हा क्षण काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी विराट कोहलीच्या (Virat Kohli) हावभावांनी पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मने जिंकली.
Hands on 🗣️The Raj & The King 👑!#CSKvRCB #Yellove #WhistlePodu 🦁💛 @Ruutu1331 @imVkohli pic.twitter.com/eeh8gYIZvk
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 13, 2022
Virat Kohli talking with Ruturaj after the match – always for the youngsters. #IPL2022 pic.twitter.com/aalq9gNbtD
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2022
सामन्याचा आढावा
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पाने शानदार खेळी करत १६५ धावांची भलीमोठी भागीदारी केली. यामुळे चेन्नईने बेंगलोरपुढे २१६ धावांचे आव्हान उभे केले. बेंगलोरला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. उथप्पाने यावेळी आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम ८८ धावांची खेळी केली. दुसरीकडे, शिवम दुबेनेही नाबाद ९५ धावांची अफलातून खेळी करत वाहवा लुटली. चेन्नईचे गोलंदाजही उपयुक्त ठरले. महीश तीक्षणाने सर्वाधिक ४ विकेट्स चटकावल्या. तसेच, कर्णधार रवींद्र जडेजाने बेंगलोरविरुद्ध ३ विकेट्स घेण्याची किमया केली.
Ruturaj & Virat Kohli after the match! #CSKvRCB #WhistlePodu @ChennaiIPL pic.twitter.com/a9FMplS0IN
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) April 13, 2022
आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ५ सामने खेळताना पहिला विजय मिळवला. दुसरीकडे, बेंगलोर संघाचा हा हंगामातील दुसरा पराभव होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
Video: ‘कॅप्टनकूल’च्या रणनीतीमध्ये फसला विराट; पुल शॉट मारायच्या नादात ‘अशी’ दिली विकेट
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर