भारताचा ‘कसोटी स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा याला त्याच्या संयमी खेळीसाठी ओळखले जाते. त्यामुळे क्रिकेटच्या सर्वात जलद स्वरुपात अर्थात टी२० क्रिकेटमध्ये खेळण्याची त्याला जास्त संधी मिळत नाही. जगप्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो जास्त खेळताना दिसत नाही. परंतु यंदा चेन्नई सुपर किंग्जसारखा बलाढ्य खरेदीदार मिळाल्याने पुजाराचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी हंगामात आपल्यातील फलंदाजीची धमक दाखवण्यासाठी तो आतुर असल्याचे त्याने सांगितले आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पुजारा म्हणाला की, “मी या गोष्टीशी सहमत आहे की माझा स्ट्राईक रेट चांगला नाही. मी एक चांगला पावर हिटर नाही. पण मी विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. मला माझ्या फलंदाजीत जास्त सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. रोहित-विराटसारखे फलंदाज योग्य वेळ पाहून चेंडूला हिट करत असतात. मर्यादित षटकांच्या स्वरुपात खेळताना मी त्यांचे बारीक निरिक्षण केले आहे.”
“तुम्ही केन विलियम्सन, स्टिव्ह स्मिथ यांसारख्या फलंदाजांना पाहून या गोष्टी शिकू शकता. हे सर्व फलंदाज केवळ चांगले शॉट खेळत धावा बनवत असतात आणि सोबतच काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करत असतात. मी देखील हीच मानसिकता ठेवली आहे. जर मला आयपीएलमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मला काही-ना-काही नविन करावे लागणार आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी ताकदची गरज असते. पण क्रिकेटची पूर्ण जाण असल्यास या गोष्टीही सहज साध्य होतात,” असे पुढे पुजारा म्हणाला.
Experiencing that super feeling of FDFS! #WhistlePodu #Yellove 🦁💛 @robbieuthappa @cheteshwar1 @gowthamyadav88 pic.twitter.com/WjRRDmYeG9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 29, 2021
चेन्नई सुपर किंग्जचा या हंगामातील पहिला सामना १० एप्रिल रोजी होणार आहे. गतवर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध त्यांची ही लढत होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मी अजिबात या गोष्टींचा त्रागा करुन घेत नाही; सातत्याने दुर्लक्षित होत असलेल्या कुलदीपचं मोठ विधान