विश्वचषक 2023 स्पर्धा एकूण 45 दिवस चालली. 10 संघात एकूण 48 सामने खेळले गेले. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्याने स्पर्धेचा शेवट झाला. या सामन्याचा विजेता ऑस्ट्रेलिया संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने हा सामना जिंकत तब्बल 6व्यांदा आयसीसी वनडे विश्वचषकाचा किताब आपल्या नावावर केला. असे असले, तरीही या स्पर्धेत कमी सामने खेळण्याची संधी मिळालेला मोहम्मद शमी चमकला. त्याने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. चला तर, विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात…
विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
1. मोहम्मद शमी
असे खूप कमी गोलंदाज असतात, ज्यांना जास्त संधी न मिळूनही, ते मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेऊन सर्वांचे लक्ष वेधतात. त्यांच्यात मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचाही समावेश आहे. शमी याला सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. मात्र, त्याला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने कहर कारनामा केला. त्याने आतापर्यंत अवघ्या 7 सामन्यात 10.70च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच, 1 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 57 धावा खर्चून 7 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
2. ऍडम झम्पा
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) आहे. त्याने 11 सामन्यात गोलंदाजी करताना 5.36च्या इकॉनॉमीने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 3 वेळा एका डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 8 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
3. दिलशान मदुशंका
श्रीलंका संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असले, तरीही त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) याने कमाल केली आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात गोलंदाजी करताना 6.70च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने स्पर्धेत डावात 1 वेळा 4 विकेट्स आणि 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 80 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
4. जसप्रीत बुमराह
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हादेखील या यादीत सामील आहे. त्याने 11 सामन्यात गोलंदाजी करताना 4.06 या शानदार इकॉनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1 वेळा डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. तसेच, 39 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. (top 5 players who takes most wickets in cwc 2023)
5. जेराल्ड कोएट्जी
दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. यामागील कारण म्हणजे त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज होय. संघाचा गोलंदाज जेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याने फक्त 7 सामन्यात गोलंदाजी केली आहे, पण तो या सामन्यांमध्ये 6.40च्या इकॉनॉमीने 18 विकेट्स घेत यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 1 वेळा डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. 44 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील शानदार कामगिरी आहे. (CWC Top 5 bowlers who takes most wickets in world Cup 2023 this Indian on the top)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये भारत आघाडीवर! 10 षटकातच ऑस्ट्रेलियाची हालत खस्ता, शमी-बुमराह बरसले
बुमराहामुळे चाहत्यांना आठवली 2003 वर्ल्डकप फायनल, वेगवान गोलंदाजाची आकडेवारी चिंता वाढवणारी