रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने आपल्या भेदक गोलंदाजीने पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा काटा काढला.
मोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट
तब्बल 140 कोटी भारतीयांना आनंदी करण्याचे काम मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने केले. शमीने आपल्या पहिल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्या षटकात डेविड वॉर्नर (David Warner) याचा काटा काढला. शमीने स्ट्राईकवर असलेल्या वॉर्नरला पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर तोच चेंडू टाकताना वॉर्नरला विराट कोहली (Virat Kohli) याच्या हातून झेलबाद केले. झाले असे की, चेंडू वॉर्नरच्या बॅटची कड घेत मागच्या दिशेने गेला. यावेळी कोणतीही चूक न करता शानदार पद्धतीने विराट कोहली कॅच (Virat Kohli Catch) पकडण्यात यशस्वी झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाने दिले 241 धावांचे आव्हान
या सामन्यात नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी भारताने निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या. यावेळी भारताकडून दोन खेळाडूंनी अर्धशतक केले. त्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. विराटने 63 चेंडूत 54 धावा केल्या. तसेच, राहुलने 107 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा यानेही 31 चेंडूत 47 धावांची विस्फोटक खेळी केली. यावेळी उपांत्य सामन्यात शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरला अंतिम सामन्यात फक्त 4 धावांवर समाधान मानावे लागले.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पा यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Mohammed Shami gets David Warner and this time Virat kohli takes catch)
हेही वाचा-
भलेभले आले, पण 48 वर्षांच्या World Cup इतिहासात ‘असा’ पराक्रम रोहितशिवाय कुठल्याच कर्णधाराला नाही जमला, वाचा
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप