इंग्लंड आणि वेल्समध्ये दिड महिना सुरु असलेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची काल सांगता झाली. यजमान इंग्लंडने या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि त्यांचे 44 वर्षांचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले. हे इंग्लंडचे पहिलेच विश्वविजेतेपद आहे.
आयसीसीने आज या स्पर्धेचा 12 जणांचा संघ आज जाहिर केला आहे. आयसीसीच्या या विश्वचषकाच्या 12 जणांच्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनकडे सोपवण्यात आले आहे.
तसेच या संघात भारताचा रोहित शर्मा आणि इंग्लंडचा जेसन रॉय या दोघांचा सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मधल्या फळीत तिसऱ्या क्रमांकावर विलियम्सन, चौथ्या क्रमांकावर जो रुट आहेत. तर अष्टपैलू म्हणून बांगलादेशच्या शाकिब अल हसन आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सला संधी देण्यात आली आहे.
तसेच या संघाचा यष्टीरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स कॅरेची निवड करण्यात आली आहे.
गोलंदाजांच्या फळीत ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्यूसन आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा 12 वा खेळाडू म्हणून आयसीसीच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
असा आहे 2019 विश्वचषकातील आयसीसीचा सर्वोत्तम 12 खेळाडूंचा संघ –
रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विलियम्सन(कर्णधार), जो रुट, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, ऍलेक्स कॅरे(यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्यूसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
Your #CWC19 Team of the Tournament! pic.twitter.com/6Y474dQiqZ
— ICC (@ICC) July 15, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून मोईन अली, आदील राशिदने घेतला नाही इंग्लंडच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग
–…आणि बेन स्टोक्सने मागितली केन विलियम्सनची माफी
–नोव्हाक जोकोविचने फेडररचा पराभव करत पाचव्यांदा मिळवले विम्बल्डनचे विजेतेपद