भारतीय युवा महिला बॉक्सर नीतू घंघासने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) सुवर्णमय पदार्पण केले आहे. तिने २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या हंगामातील महिलांच्या ४८ किलोग्राम वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड हिला पराभूत केले. तिचे हे सुवर्ण पदक महिला हॉकी संघाने कांस्य पदक जिंकल्याच्या काही क्षणातच आले आहे. तसेच भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पण महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. यामुळे तिच्याकडूनही भारताला सुवर्ण पदकाच्या आशा आहेत.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीतू गंघास (Nitu Ghanghas) हिने भारतासाठी १४ वे सुवर्ण जिंकले. नीतूची इंग्लिश बॉक्सरसोबतची लढत तिन्ही फेऱ्यांमध्ये जबरदस्त झाली. तिच्या या प्रवासाला कशी सुरूवात झाली ते आपण पाहुया.
मेरी कोमला ठोसा मारत पाडले
नीतू ही हरियाणाची आहे. हरियाणाने भारताला अनेक उत्तम बॉक्सर दिले आहेत, ज्यांनी पदके जिंकली आहेत. त्यातील एक म्हणजे विंजेदर कुमार. २१ वर्षाच्या नीतूने ट्रायल बाउटमध्ये मेरी कोमला ठोसा मारत पाडले होते. यामुळेच ती कॉमनवेल्थ गेम्स आणि बाकी स्पर्धांना पात्र ठरली होती. या तिच्या यशामागे तिची मेहनत तर आहेत त्यासोबत कुटुंबाचाही मोठा हात आहे.
वडिलांनी नोकरी टाकली होती संकटात
नीतूचे वडिल भगवान हरियाणा सचिवालयात काम करतात. मुलीला बॉक्सर बनवण्यासाठी त्यांनी नोकरी संकटात टाकली होती. नीतूच्या सरावासाठी त्यांना मोठी सुट्टी घ्यावी लागली होती. तसेच त्यांना काही वर्षांपासून पगारही मिळाला नव्हता. अशी परिस्थिती असताना मुलीने नुकतेच सुवर्ण पदक जिंकत घराचेच नाही तर देशाचेही नाव मोठे केले आहे.
नीतूने या स्पर्धेतील तिन्ही फेरींमध्ये पहिल्यापासूनच आपले वर्चस्व ठेवले होते. पहिल्या फेरीत ५ पैकी ४ रेफ्रींनी नीतूला १०-१० गुण दिले. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही रेफ्रींचा निर्णय तिच्याच बाजूने आला. तिसऱ्या फेरीनंतर सर्व रेफ्रींनी निर्णय नीतूच्या बाजूने दिला. इंग्लंडच्या बॉक्सरविरुद्ध, नीतूला तिच्या उंचीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे तिला ठोसे मारणे सोपे झाले.
नीतूने २०१७ आणि २०१८ला युवा विश्वचॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG BREAKING: ट्रिपल जंपमध्ये ‘पॉल-अब्दुल्ला’ने रचला इतिहास! गोल्ड-सिल्वर भारताच्याच नावे
अमित पंघलच्या ‘पावरफुल’ पंचने मिळाले भारताला १५ वे सुवर्ण