इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. नॉटिंंघमच्या पहिल्या कसोटी सामन्यात सततच्या पावसामुळे पहिला सामना अनिर्णीत राहिला. ज्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी चांगली फलंदाजी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ३९१ धावा केल्या. ज्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटची १८० धावांची सर्वोच्च खेळी राहिली. यामुळे इंग्लंडला २७ धावांची बढत देखील मिळाली.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला होता. तेव्हा जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनला केलेली गोलंदाजी चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा अँडरसन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता, तेव्हा बुमराहने अँडरसनला अनेकवेळा बाउन्सर टाकले. यामध्ये अनेक वेळा अँडरसनला बुमराहच्या बाउन्सरने अडचण निर्माण झाली. एक चेंडू तर अँडरसनच्या हेल्मेटला देखील लागला होता. बुमराहची अशी गोलंदाजी पाहून दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाज डेल स्टेनने याबाबत एक ट्विट केले आहे.
डेल स्टेनने याबाबत एक ट्विट करत लिहिले, “जसप्रीत बुमराह जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येईल. तेव्हा जेम्स अँडरसन मुद्दामहून गोलंदाजी करण्यासाठी मागेल.” त्याच्या म्हणण्यानुसार बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल, तेव्हा अँडरसन, त्याला करण्यात आलेल्या बाउन्सरचा चांगलाच बदला घेऊ शकतो. सध्या डेल स्टेनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. स्टेन हा दक्षिण आफ्रिकेच्या महान गोलंदाजांनी पैकी एक गोलंदाज होता.
Jimmy gana be begging for the ball when Jasprit comes in to bat…
— Dale Steyn (@DaleSteyn62) August 14, 2021
दरम्यान, इंग्लंडला तिसऱ्या दिवशी २७ धावांची बढती मिळाली होती. त्यानंतर चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित
–पुजारा-रहाणे यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल भडकले सुनील गावस्कर; म्हणाले, “ही केवळ त्यांची चूक नाही तर…”
–‘इंग्लंडचे गोलंदाजच भारताच्या विजयाला ठरू शकतात कारणीभूत’, पाहा असं का म्हणाला ब्रॉड