---Advertisement---

पाकिस्तानच्या माजी स्पिनरचे मोठे विधान; म्हणतोय, टी-२० विश्वचषकात पुनरागमन नाही करू शकणार बुमराह

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 3:41 PM
Jasprit-Bumrah-T20
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी आशिया चषकात खेळू शकणार नाही. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाच्या मते बुमराहची दुखापत गंभीर आहे. याच कारणास्तव ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात तो खेळेल, अशी खात्री देता येणार नाही. अनेरियाचने असा दावा केला आहे की, बुमराह आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. 

दानिश केनेरीया (Danish Kaneriya) याच्या मते जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) एक विश्वस्तरीय गोलंदाज आहे आणि जबरदस्त यॉर्कर टाकू शकतो. कनेरियाच्या म्हणण्याप्रमाणे बुमराहच्या पाठीला झालेली दुखापत ही मोठी चिंता बनत आहे आणि पुढचा मोठा काळ ही चिंता भारतीय संघासोबत असेल. आशिया चषकानंतर यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. कनेरियाने यावेळी बुमराहच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवर देखील प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे त्यांला वारंवार दुखापत होत आहे.

“असे होऊ शकते की, तो ऑक्टोबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक भाग घेणार नाही. भारतीय चाहत्यांसाठी ही एक खूपच ब्रेकिंग आणि वाईट बातमी आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की, दरम्यानच्या काळात बुमराहच्या आजुबाजूला चांगले गोलंदाज तयार आहेत. संघात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या रूपात एक गोलंदाज आला आहे, जो सुरुवातील तुमच्यासाठी चांगला स्पेल करू शकतो. षटकांमध्ये  शेवटचा विचार केला तर त्याठिकाणी अर्शदीप जो यॉर्कर टाकतो तो अधिक धारदार असेल. अर्शदीपने नुकताच वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार जिंकला. त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली आहे, त्याने स्वतःची गुणवत्ता दाखवून दिली आहे. येणाऱ्या काळात तो खूपच चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज बनू शकतो,” असेही कनेरिया पुढे बोलताना म्हणाला.

कनेरीयाने यावेळी संघातील इतरही गोलंदाजांचा उल्लेख केला, जे बुमराहच्या अनुपस्थितीत टी-२० विश्वचषकामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून संघाला विजय मिळवून देऊ शकतात.  बुमराह जर विश्वचषकापर्यंत बरा झाला नाही, तर संघात त्याची जागा भरण्यासाठी भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, उमरान मलिक, आवेश खान, या गोलंदाजांपैकी काहींना संधी मिळू शकते. मोहम्मद शमी देखील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याला विश्वचषकात संधी मिळण्याविषयी शंका आहे. त्याव्यतिरिक्त टी नटराजन हा अजून एक पर्याय संघाकडे असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड

भारतीय खेळाडूचा टी२० लीगमध्ये शतकी तडाखा, अजून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पणही नाही झाले

Asia Cup: आता अफगाणिस्तानचं काही खरं नाही! टी२०तील दिग्गज गोलंदाजच आऊट ऑफ फॉर्म

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---