भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियम येथे खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेकीच्या काही वेळापूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी मैदानात मस्तीच्या मूडमध्ये दिसला. खरं तर, टॉसच्या काही वेळापूर्वी सॅमी मैदानात सुरू असलेल्या तालावर नाचताना दिसला. यादरम्यान सॅमी या ट्यूनमध्ये इतका व्यस्त दिसला की तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आवाज दिल्यानंतरही तो ऐकू शकला नाही.
मात्र सॅमी हा पहिला कॅरेबियन खेळाडू नाही जो मस्त शैलीत जगतो. अनेकदा वेस्ट इंडिजचे खेळाडू या स्टाइलमध्ये पाहायला मिळतात. खरंतर वेस्ट इंडिजच्या अनेक खेळाडूंची खासियतच मैदानावर सुरू असणारी मजा मस्ती असते. यामध्ये प्रामुख्याने ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो यांसारख्या खेळाडूंचा समावेश होतो. डॅरेन सॅमी हा वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार आहे. सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. शिवाय सॅमी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.
https://www.instagram.com/tv/CgmUKLRKJ_3/?utm_source=ig_web_copy_link
सॅमीने वेस्ट इंडिजकडून ३८ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६३ डावात २१.७ च्या सरासरीने १३२३ धावा केल्या. कसोटी क्रिकेटव्यतिरिक्त, त्याने १२६ एकदिवसीय सामन्यांच्या १०५ डावांमध्ये 24.9 च्या सरासरीने १८७१ तर, ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ५२ डावांमध्ये १७.३च्या सरासरीने ५८७ धावा केल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कॅरेबियन संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ८४, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विंडीजला ६८ धावांनी मात दिली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात मात्र, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिज संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ १२२ धावा करता आल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सिक्स, फोर अन् मग डायरेक्ट घरचा रस्ता! पाहा भारतीय गोलंदाजाचा जोरदार कमबॅक
WIvsIND। भारताच्या ‘या’ ४ शिलेदारांची साथ, रोहित आर्मीने केली विंडीजवर मात!
सूर्याचा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, आगळ्यावेगळ्या फटक्याला पाहून व्हाल अचंबित