अँटिग्वा। वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा आजपासून(17 ऑगस्ट) वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना सुरु होणार आहे. या सराव सामन्यासाठी 14 जणांच्या वेस्ट इंडीज अ संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या सराव सामन्यासाठी डॅरेन ब्रावो आणि जॉन कॅम्पबेलची वेस्ट इंडीज अ संघात निवड करण्यात आली आहे. या दोघांचा 22 ऑगस्ट पासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीजच्या संघातही समावेश आहे. ही 2 सामन्यांची कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीपचाही भाग आहे.
या सराव सामन्यात वेस्ट इंडीज अ संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज जाहमर हॅमिल्टन करणार आहे.
या सराव सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी आहे.
त्याला वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान अंगठ्याची दुखापत झाली असल्याने त्यातून तो सावरत आहे.
तसेच कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाशी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मयंक अगरवाल हे खेळाडू जोडले गेले आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माही या मालिकेत कशी कामगिरी करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्या सराव सामन्यासाठी असे आहेत संघ –
वेस्ट इंडीज – जाहमर हॅमिल्टन (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, अकिम फ्रेझर, केन हार्डिंग, कॅव्हेम हॉज, ब्रँडन किंग, जेसन मोहम्मद, मार्क्विनो मिंडली, खॅरी पिएर, रोव्हमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, जेरेमी सोलोझानो.
भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, उमेश यादव .
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सचिनला जे काम २०० कसोटीत जमले ते या गोलंदाजाने ६६ कसोटीतच केले
–संपूर्ण यादी: आत्तापर्यंत या दिग्गजांनी सांभाळले आहे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद!
–शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर कपिल देव म्हणाले…






