न्यूझीलंडचा महत्वाचा खेळाडू डॅरिल मिशेल शुक्रवार, 7 ऑक्टोबर रोजी दुखापतग्रस्त झाला. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड संघासाठी हा मोठा झटका आहे. माहितीनुसार मिचेलच्या हाताला दुखापत झाली आहे आणि याच कारणास्ताव तो आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर होण्याची पूर्ण शक्यता सांगितली जात आहे. सध्या न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. यादरम्यान सराव करताना त्याला ही दुखापत झाली आणि या मालिकेतून माघार देखील घ्यावी लागली.
माध्यमांतील वृत्तानुसार न्यूझीलंड संघाच्या सराव सत्रात डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) फलंदाजीचा सराव करत होता आणि यावेळी त्याचे बोटाला दुखापत झाली आहे. एक्स-रे केल्यानंतर असे समजले की, त्याच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अंदाजे दोन आठवड्यांचा काळ लागू शकतो. न्यूझीलंड संघाचे फिजिओ थियो कपाकौलकिस यांनी याविषयी पुष्टी केली आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead) यांनी दिलेल्या माहितीनुसार मिचेल आगामी टी-20 विश्वचषकात खेळणार की नाही, हे येत्या काही दिवसांमध्ये समजू शकेल.
टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार असून न्यूझीलंड संघ 15 ऑक्टोबर रोजी विश्वचषकासाठी रवाना होईल. न्यूझीलंड क्रिकेटने स्टेडच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, “हे खूप निराशाजनक आहे की, डेरिल दुखापतग्रस्त झाला आहे. तो आमच्या टी-20 संघाचा महत्वाचा भाग आहे. या तिरंगी लढतीत देखील त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाची कमतरता जाणवेल. विश्वचषकाती आमच्या पहिल्या सामन्याला दोन आठवड्यांपेक्षा काहीसा जास्त वेळ आहे. आमच्याकडे डॅरिलच्या उपलब्धतेविषयी विचार करण्यासाठी अजून पुरेसा वेळ आहे.”
दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंड संघ आधीपासूनच सुपर 12चा भाग आहे. सुपर 12 फेरी 22 ऑक्टोबरपासून सुरू होईल, ज्याचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ टी-20 विश्वचषकातील अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत करेल. अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला न्यूझीलंड संघ –
केन विलियम्सन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: पूजा वस्त्राकरनंतर दीप्ति शर्माचा पाकिस्तानला ‘डबल’ झटका
संजूचा संघर्ष पडला तोकडा! पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 9 धावांनी विजय