गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (२४ मे) झालेला आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना चित्तथरारक राहिला. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
गुजरातच्या (GT vs RR) या विजयाचा शिल्पकार डेविड मिलर (David Miller) राहिला. मिलरने त्याचा माजी संघ राजस्थानविरुद्ध (Former Team Rajasthan Royals) वादळी अर्धशतकी खेळी. तसेच शेवटच्या षटकात सलग ३ षटकार ठोकत गुजरात संघाला अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवून दिले.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरच्या ८९ धावा आणि कर्णधार संजू सॅमसनच्या ४७ धावांच्या खेळीचा या समावेश होता. प्रत्युत्तरात गुजरातला चांगली सुरुवात मिळाली नाही. त्यांनी शून्य धावेवर पहिली विकेट गमावली. मात्र त्यानंतर गुजरातने दमदार पुनरागमन केले.
कर्णधार हार्दिक पंड्याने मिलरला साथीला घेत १९व्या षटकापर्यंत ३ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावा जोडल्या. गुजरातला विसाव्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. अशात हे महत्त्वपूर्ण षटक टाकण्यासाठी राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा आला होता. प्रसिद्धच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर मिलरने खणखणीत षटकार खेचत त्याचे स्वागत केले. त्यानंतर सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकारांची बरसात मिलरने केली.
https://twitter.com/cric_zoom/status/1529165004624527361?s=20&t=SfA9oTviM_IZNJKSrrbvcQ
𝐃𝐎 𝐍𝐎𝐓 𝐌𝐈𝐒𝐒 𝐓𝐇𝐈𝐒! @DavidMillerSA12 kept his calm & set the stage on fire 🔥 🔥 with a brilliant match-winning knock, powering @gujarat_titans to the final. 👏 👏 #TATAIPL | #GTvRR
Relive that innings 🎥 🔽 https://t.co/VrNe07s8Ca
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
अशाप्रकारे षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत मिलरने दिमाखात गुजरात संघाला ३ चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकून दिला. याशिवाय मिलरने संपूर्ण सामन्यात ३८ चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार व ३ चौकार ठोकले. त्याच्या या कौतुकास्पद खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दरम्यान मिलरने आयपीएल २०२२मध्ये गुजरातसाठी आतापर्यंत ४४९ धावा केल्या आहेत. १५ सामने खेळताना ६४.१४ च्या सरासरीने त्याने या धावा जोडल्या आहेत. तसेच यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतकेही निघाली आहेत. त्याची चालू हंगामातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ९४ धावा इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त आयपीएलमध्येच होऊ शकतं!! एकाच चेंडूवर २ रनआऊट आणि ४ धावा, पाहा लास्ट बॉलचा सावळा गोंधळ
‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक